LPG Price Hike : सणासुदीपूर्वीच महागला एलपीजी गॅस सिलेंडर, दिल्ली पासून ते मुंबईपर्यंत इतका वाढला भाव

LPG Cylinders Rate Hike : ऐन सणासुदीच्या तोंडावर, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांना महागाईचा झटका बसला. ऑगस्ट महिन्यानंतर 1 सप्टेंबर 2024 रोजी एलपीजी सिलेंडर किंमतीत वाढ झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक गॅसच्या दरात वाढ केली आहे. घरगुती गॅसबाबत काय आहे अपडेट?

LPG Price Hike : सणासुदीपूर्वीच महागला एलपीजी गॅस सिलेंडर, दिल्ली पासून ते मुंबईपर्यंत इतका वाढला भाव
ग्राहकांच्या खिशाला किती बसणार झळ?
Follow us
| Updated on: Sep 01, 2024 | 8:51 AM

आज सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाचा ग्राहकांना झटका बसला. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी एलपीजी गॅस सिलेंडर महाग झाला. ऑगस्ट महिन्यात पण 19 किलो व्यावसायिक गॅस महागला होता. आता या महिन्यात सुद्धा गॅसचा भाव वाढला. ऐन सणासुदीच्या तोंडावर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस महागल्याने हॉटेलमधील खाद्यपदार्थ महागण्याची शक्यता आहे. तर 14 किलो घरगुती गॅस सिलेंडरची किंमत जशीच्या तशी आहे. त्यात बदल झाला नाही.

दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत किती वाढले भाव

IOCL च्या संकेतस्थळानवुसर, दिल्ली ते मुंबईपर्यंत व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात बदल झाला. 1 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजता ही दरवाढ लागू करण्यात आली. ताज्या दरानुसार, राजधानी दिल्लीत 19 किलो एलपीजी गॅस सिलेंडर 1652.50 रुपयांहून 1691.50 रुपये झाली. दिल्लीत 39 रुपये प्रति सिलेंडर दरवाढ झाली. कोलकत्ता शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात 38 रुपयांची वाढ झाली. 1764.50 रुपयांहून किंमत 1802.50 रुपयांवर पोहचले. तर मुंबईत 1644 रुपयांहून भाव 1605 रुपये म्हणजे 7 रुपयांनी किंमत वाढली. चेन्नईमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरमध्ये 38 रुपयांची दरवाढ झाली. 1817 रुपयांहून दर 1855 रुपयांवर पोहचला.

हे सुद्धा वाचा

जुलै महिन्यानंतर दरवाढ

यापूर्वी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत दरवाढ झालेली दिसत आहे. जुलै 2024 मध्ये ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी दर कपातीची ग्राहकांना भेट दिली होती. कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात केली होती. जवळपास 30 रुपयांनी किंमती कमी झाल्या होत्या. तर ऑगस्ट आणि आता सप्टेंबरमध्ये तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात वाढ केली आहे.

इतकी केली कपात

सरकारने होळीच्या वेळी नागरिकांना दिलासा दिला. 100 रुपयांची कपात केली होती. तर त्यापूर्वी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात 200 रुपयांनी गॅस स्वस्त झाला होता. एका वर्षात केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 300 रुपयांची कपात केली आहे. तर आता किंमतीत वाढ झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरचा भाव स्थिर

19 किलोग्रॅम व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या भावात सतत बदल दिसला. तर दुसरीकडे तेल कंपन्यांनी अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात कोणताच बदल केलेला दिसला नाही. महिला दिवशी मोदी सरकारने ग्राहकांना दिलासा दिला होता. 14 किलोग्रॅम घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल दिसला नाही. सध्या दिल्लीत एका सिलेंडरची किंमत 803 रुपये, कोलकत्तामध्ये 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईत हा भाव 818.50 रुपये इतका आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.