LPG Price Hike : सांगा कसे करावे सण साजरे, दोन वर्षांत घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढले झरझर

LPG Price Hike : घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. LPG गॅस सिलेंडरच्या किंमती 1 मार्च रोजी पुन्हा वधारल्या. एलपीजी 50 रुपयांनी महागले. तर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350 रुपयांची वाढ झाली. सिलेंडरची किंमत 1103 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

LPG Price Hike : सांगा कसे करावे सण साजरे, दोन वर्षांत घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढले झरझर
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 8:19 PM

नवी दिल्ली : केंद्र सरकार महागाईच्या (Inflation) आघाडीवर सपशेल फेल ठरल्याचे चित्र आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनेतला कुठलाच दिलासा मिळत नसल्याचे त्यांच्यात प्रचंड रोष आहे. खाद्यान्न आणि खाद्यपदार्थ, अन्नधान्य अगोदरच महाग झाले आहे. आता कंपन्यांनी घरगुती गॅसच्या (LPG Price) किंमतीत पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जोरदार झटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव अगोदरच गगनाला भिडलेले आहेत. त्यात जीएसटीमुळे दैनंदिन वापरातील वस्तूंचे भावही वाढले आहेत. खाद्यतेलाबाबतच (Edible Oil) तो काय थोडाफार दिलासा मिळत आहे. बाकी सर्वच वस्तूंच्या किंमती दोन वर्षांत झपाट्याने वाढल्या आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरच्या (Commercial Cylinder) किंमतीत 350 रुपयांची वाढ झाली. सिलेंडरची किंमत 1103 रुपयांपर्यंत पोहचली आहे. या 1 मार्चपासून ही दरवाढ लागू होईल.

मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात घरगुती एलपीजी गॅसच्या किंमती सूसाट आहेत. 400 रुपयांच्या आतबाहेर मिळणारे सिलिंडर आज हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. यामध्ये जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पण गेल्या वर्षी 6 जुलै 2022 रोजी पासून किंमतीत मोठी वाढ झालेली नाही. आता सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत सरत्या वर्षात 4 वेळा बदल झाला. चार वेळा गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ झाली. एकूण 153.50 रुपयांची दरवाढ झाली.

एप्रिल 2021 पासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 284 रुपयांची वाढ झालेली आहे. एप्रिल 2021 मध्ये गॅस सिलेंडर 809 रुपयांत विक्री होत होते. त्यानंतर आतापर्यंत यामध्ये 9 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. वर्ष 2021 मध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीत 205.5 रुपयांची वाढ झाली. तर 2022 मध्ये 153.5 रुपयांनी किंमती वाढल्या. यावर्षात, 2023 मध्ये पहिल्यांदा एलपीजी सिलेंडरच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1103 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

व्यावसायिक सिलेंडरच्या (Commercial Cylinder) किंमतीत 350 रुपयांची वाढ झाली. कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे आदीवरील जेवण महागले. गॅस दरवाढीमुळे जेवणाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आता हॉटेलमधील जेवण महागणार आहे. त्यासाठी ग्राहकाला अधिकचा खर्च करावा लागणार आहे.

  1. 1 एप्रिल 2021 मध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती 809 रुपये होत्या
  2. 1 एप्रिल 2022 मध्ये गॅस सिलेंडर 949.5 रुपयांना मिळत होते
  3. जुलै 2022 मध्ये एलपीजीची किंमत 1045 रुपयांवर पोहचली
  4. मार्च 2023 एलपीजीची किंमत 1103 रुपयांवर पोहचली

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.