महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँक सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती

हाराष्ट्रातील बँकांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच चेक क्लियरन्सचं काम जालणार आहे. (maharashtra bank opening and closing time)

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँक सुरु आणि बंद होण्याच्या वेळेत बदल, जाणून घ्या संपूर्ण माहिती
Bank-Image
Follow us
| Updated on: Apr 22, 2021 | 9:21 PM

मुंबई : देशात कोरोनाची दुसरी लाट हाहा:कार माजवतेय. रोज नव्याने हजारो रुग्ण आढळत आहेत. संसर्ग होऊ नये म्हणून विविध राज्यांनी कठोर निर्णय घेतले आहे. तसेच विविध संस्थासुद्धा कोरोना प्रतिबंधक नियम पाळत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यानी बँकेच्या व्यवहारासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील बँकांमध्ये सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच चेक क्लियरन्सचं काम जालणार आहे. हा निर्णय 23 एप्रिलपासून लागू होईल. तसे आदेश देण्यात आले आहेत. (Maharashtra and Uttar Pradesh bank opening and closing time has been changed to avoid Corona virus transmission to employee)

बँक सुरु आणि बंद होण्याची वेळ बदलली

उत्तर प्रदेशमध्ये सर्व बँक बंद आणि सुरु होण्याच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. येथे सकाळी 10 पासून ते दुपारी 2 वाजेपर्यंतच बँक सुरु राहतील. तसेच या काळात बँकेमध्ये कमीत कमी सेवा दिली जाईल. यामध्ये चेक क्लियरिंग, सराकारी व्यवहार, ट्रान्झिन्स तसेच इतर तत्सम सेवांचा समावेश आहे.

कर्मचाऱ्यांची संख्या 50 टक्क्यांवर

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने बँकेचे सर्व काम फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बाकीचे 50 टक्के कर्मचारी हे घरून काम करतील. सध्या बँकेच्या कामकाजामध्ये अनेक बदल करण्यात आलेले असले तरी बँकांमध्ये ATM, सिक्योरिटी डिपॉझिट, डेटा ऑपरेशन, सायबर सिक्योरिटी, क्लियरिंग हाऊस, बैंक ट्रॅजेरी असे  सर्व व्यवहार पहिल्यासारखेच नॉर्मल पद्धतीने पार पाडले जातील. बँकेचे हे आदेश 22 एप्रिल ते 15 मेपर्यंत लागू राहतील. तसेच सरकारच्या आदेशानुसार आगामी काळात नियमांचा कालावधी वाढवलासुद्धा जाऊ शकतो.

दरम्यान, देशात कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे यूएफबीयू ने आईबीएला एक निवेदन दिले आहे. यामध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत सार्वजनिक कामाचे तास कमी करावेत अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच कामाचे हे तास प्रतिदवस तीन तासापर्यंत आणावेत, अशी मागणीसुद्धा यूएफबीयूने केली आहे.

इतर बातम्या :

‘या’ बँकेचा कोरोना संकटात ग्राहकांना दिलासा; व्याजदर घटवले, आता EMI किती?

Gold price today: सोने पुन्हा एकदा झालं स्वस्त, पटापट जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव

(Maharashtra and Uttar Pradesh bank opening and closing time has been changed to avoid Corona virus transmission to employee)

Non Stop LIVE Update
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन
... हा महाराष्ट्र या नराधमांच्या हाती देऊ नका, चित्रा वाघ यांचे आवाहन.
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.