फडणवीसांनी लावलेला सेस अजूनही कायम, पेट्रोल-डिझेलबाबत ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार?

पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel price maharashtra) वाढत्या दराने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पेट्रोल दराने शंभरी गाठली आहे.

फडणवीसांनी लावलेला सेस अजूनही कायम, पेट्रोल-डिझेलबाबत ठाकरे सरकार मोठा निर्णय घेणार?
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 2:00 PM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) वाढत्या दराने वाहनचालकांची डोकेदुखी वाढली आहे. पेट्रोल दराने शंभरी गाठली आहे. मात्र ठाकरे सरकार राज्यातील जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याचे संकेत आहेत. राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती अर्थखात्यातील सूत्रांनी दिली आहे. (Maharashtra govt may reduce drought cess on petrol diesel price)

पेट्रोल-डिझेलवर राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये थोड्याफार प्रमाणात कपात केली जाऊ शकते. येत्या 8 मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकसल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील सेस काही प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.

राज्यात पडलेल्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी तेव्हाच्या राज्य सरकारने 2018 मध्ये पेट्रोल आणि डिझेलवर दुष्काळ कर म्हणून 2 रुपये सेस आकारला होता. आता दुष्काळ नसला तरी हा दोन रुपये सेस अद्यापही कायम आहे. राज्य सरकार व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारत आहे. यातील सेस काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

राज्यातील पेट्रोलचे आजचे दर

मुंबई – 97.34 प्रतिलिटर

ठाणे – 96.86 प्रतिलिटर

पुणे – 97.47 प्रतिलिटर

नागपूर – 97.84 प्रतिलिटर

सांगली – 97.26 प्रतिलिटर

सातारा – 97.81 प्रतिलिटर

औरंगाबाद – 97.93 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.45 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.44 प्रतिलिटर

ठाणे – 86.61 प्रतिलिटर

पुणे – 87.21 प्रतिलिटर

नागपूर – 88.99 प्रतिलिटर

सांगली – 87.04 प्रतिलिटर

सातारा – 87.57 प्रतिलिटर

औरंगाबाद – 87.89 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.22 प्रतिलिटर

कर किती आणि कोणता (89.29 रुपये दर असताना)

मूळ किंमत (1 लीटर पेट्रोलचा एक्‍स फॅक्‍टरी दर)- 31.82 रूपये

वाहतूक खर्च – 0.28 पैसे

उत्पादन शुल्क – 32. 90 रू . ( केंद्र सरकार )

डीलरचे कमिशन – 3. 68 रू.

मूल्यवर्धीत कर (व्हॅट) – 20.61 रू. (राज्य सरकार)

तुमच्याकडून घेतले जाणारे पैसे – 89.29 रू.

म्हणजेच 32 रुपये लीटरचं पेट्रोल तुम्हाला मिळतं, 89 रुपये 30 पैशांना…यातील केंद्र आणि राज्य सरकारची कमाई आहे लीटरमध्ये तब्बल 52 रुपये..

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते…?

दरम्यान, राज्य सरकारने इंधनावरील दर कमी करुन राज्यातील दिलासा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. शिवसेनेने काढलेल्या मोर्चावरुन त्यांनी हल्लाबोल केला होता. “सेनेने मोर्चे काढण्याची नौटंकी करू नये. राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी. मागच्या काळात आम्ही सरकारमध्ये होतो त्यावेळीही पेट्रोल डिझेल दरवाढ झाली होती. त्यावेळी मी आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी पेट्रोल डिझेलवरचा राज्याचा कर कमी केला होता आणि पेट्रोल डिझेलचे दर 2 रुपयांनी कमी केले होते. आताच्या सरकारने पेट्रोल डिझेलवर कर कमी करावा आणि पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करुन दाखवावेत.”

अजित पवार काय म्हणाले…?

राज्याच्या करापेक्षा केंद्राचा कर जास्त आहे. महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगावे, अशा श्बात अजित पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. यावेळी अजित पवार चिडलेले पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या   

पेट्रोल डिझेल भाववाढीवरुन अजित पवार भडकले, ‘पहिलं केंद्राला पेट्रोल डिझेलवरील टॅक्स कमी करण्यास सांगा”

राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचे टॅक्सेस कमी करावेत आणि भाववाढ नियंत्रणात आणावी : देवेंद्र फडणवीस

(Maharashtra govt may reduce drought cess on petrol diesel price)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.