BUDGET 2020 : आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ, बाकं वाजवून अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत

| Updated on: Mar 06, 2020 | 1:18 PM

राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या निधीत भरघोस वाढ केली (Maharashtra MLA Fund Increase) आहे.

BUDGET 2020 : आमदारांच्या निधीत एक कोटींची वाढ, बाकं वाजवून अजित पवारांच्या निर्णयाचे स्वागत
Follow us on

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारांच्या निधीत भरघोस वाढ केली (Maharashtra MLA Fund Increase) आहे. आमदारांच्या निधीत अजित पवार यांनी एक कोटींची वाढ केली आहे. त्यामुळे आता आमदारांना प्रत्येक वर्षी तीन कोटींचा निधी मिळणार आहे. अजित पवारांच्या या घोषणेवर आमदारांकडून बाकं वाजवून जोरदार या निर्णयाचे स्वागत (Maharashtra MLA Fund Increase) करण्यात आले.

राज्यातील आमदारांना मतदारसंघातील विकास कामसाठी शासनाकडून दोन कोटींचा निधी दिला जात होता. पण यामध्ये वाढ करुन तो आता तीन कोटी करण्यात आला आहे. त्यामुळे पाच वर्षात आमदारांना 15 कोटी निधी मिळणार आहे.

विशेष म्हणजे, अजित पवार यांनी यापूर्वीही 2011 रोजी आघाडी सरकारचा अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्यांनी आमदारांच्या निधीत 60 लाखांची वाढ केली होती. त्यावेळी हा निधी दीड कोटीवरुन दोन कोटी रुपये करण्यात आला होता. योगायोगाने यंदाही आमदारांच्या निधीतील वाढ अजित पवार यांनी केली आहे.

निधीमध्ये वाढ केल्यामुळे आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामाला वेग मिळणार आहे. यापूर्वी प्रत्येक आमदाराला पाच वर्षांसाठी एकूण 10 कोटी निधी मिळत होता.

दरम्यान, यंदाच्या अर्थसंकल्पात मेट्रो प्रकल्पासाठी एकूण एक हजार 657 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच एसटी बसेसमध्येही बदल करण्यात येणार आहेत. शेती, क्रीडा, महिला इतर अनेक गोष्टींसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.