नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : केंद्र सरकारची विद्युत निर्मिती कंपनी एनटीपीसी लिमिटेडने (NTPC Ltd) चालू आर्थिक वर्षात जुलै-सप्टेंबर महिन्याच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. दुसऱ्या तिमाहीत एकत्रित निव्वळ नफा 38% वाढून 4,726.40 कोटी रुपये झाला आहे. एका वर्षाच्या समान कालावधीत या कंपनीचा निव्वळ नफा 3,417.67 कोटी रुपये होता. महसूलात मोठी उचल घेतल्याने निव्वळ नफ्यात वाढ झाली आहे. कंपनीने गुंतवणूकदारांना पहिल्या अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिवाळीत लॉटरी लागणार आहे. त्यांना चांगली कमाई करता येईल. तर येत्या काळात या शेअरमध्ये तेजीचे सत्र येऊ शकते.
महसूलात झाली वाढ
एनटीपीसीच्या महसूलात मोठी वाढ दिसून आली. ही कंपनी देशात वीज उत्पादनाचं काम करते. गेल्यावर्षी या कंपनीचा निव्वळ नफा 3,417.67 कोटी रुपये होता. यंदा तो 4,726.40 कोटी रुपये झाला आहे.जुलै-सप्टेंबर या तिमाहीत कंपनीची एकूण महसूल वाढून तो 45,384.64 कोटी रुपये झाला आहे. तर एक वर्षापूर्वी याच कालावधीत तो 44,681.50 कोटी रुपये होता.
अंतरिम लाभांशाची घोषणा
एनटीपीसीच्या (NTPC) संचालक मंडळाने 10 रुपयांचा फेस व्हॅल्यू असलेल्या इक्विटी शेअरवर 2.25 रुपये प्रति शेअर या दराने अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेतला. या आर्थिक वर्षात डिव्हिडंड 23 नोव्हेंबर रोजी देण्यात येणार आहे. जितके जास्त शेअर असतील, तेवढा गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे.
वीज दरात वाढ
एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत एनटीपीसीचे सर्वसाधारण वीज शुल्क 4.61 रुपये प्रति युनिट होते. तर एक वर्षापूर्वी याच कालावधीत हा दर 4.77 रुपये प्रति युनिट होता. दुसऱ्या तिमाहीत एनटीपीसीचे एकूण वीज उत्पादन वाढून ते 90.30 अब्ज युनिट झाले आहे. एक वर्षापूर्वी याच कालावधीत 85.48 अब्ज युनिट वीज निर्मिती झाली होती. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत एनटीपीसीची वीज उत्पादन क्षमता 73,824 मेगावॅट झाली होती.
6 महिन्यात 35% रिटर्न
महारत्न कंपनी एनटीपीसी लिमिटेडच्या शेअरने (NTPC Share Price) गुंतवणूकदारांना बम्पर फायदा मिळवून दिला. गेल्या 6 महिन्यात या कंपनीने गुंतवणूकदारांना 35% रिटर्न दिला. एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 3 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे. पण या वर्षभरात या कंपनीच्या शेअरने 41 टक्क्यांहून अधिकची उसळी घेतली आहे. 27 ऑक्टोबर रोजी हा शेअर 237.10 रुपयांवर हा शेअर बंद झाला.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.