मुंबई : भारतात बनवलेल्या स्वदेशी डॉर्नियर विमानाचे व्यावसायिक उड्डाण मंगळवारपासून सुरू होत आहे. डॉर्नियर 228 विमानाचा वापर डिब्रूगड ते पासीघाटदरम्यान होणार्या उड्डाणासाठी केला जाणार आहे. हे विमान अलायन्स एअर (Alliance Air)कंपनीच्या माध्यमातून उड्डाण करणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून (Hindustan Aeronautics Limited) हे विमान गेल्या आठवड्यातच कंपनीला मिळाले आहे. केंद्र सरकारच्या (Central Goverment) नियंत्रणात असेलली अलायन्स एअर पहिल्यांदाच व्यावसायिक उड्डाणात स्वदेशी बनावटीचे डॉर्नियर विमान उड्डाणासाठी वापरणार आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने आज आज की, डॉर्नियर 228 विमानाचा वापर डिब्रूगढ ते पासीघाट दरम्यानच्या उड्डाणासाठी मंगळवारी होणार आहे. अलायन्स एअरला हे विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून गेल्या आठवड्यातच मिळाले आहे. यामुळे आता स्वदेशी बनावटीचे हे विमान उद्या अवकाशात झेपावणार असल्याने भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
नागरी उड्डयन मंत्रालयाने आज सांगितले की, डॉर्नियर 228 विमानाचा वापर डिब्रूगढ ते पासीघाट दरम्यानच्या उड्डाणासाठी मंगळवारी होणार आहे. अलायन्स एअरला हे विमान हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून गेल्या आठवड्यातच मिळाले आहे. यामुळे आता स्वदेशी बनावटीचे हे विमान उद्या अवकाशात झेपावणारअसल्याने भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.
अलायन्स एअरने दोन 17 आसनी डॉर्नियर 228 विमाने भाड्याने देण्यासाठी फेब्रुवारीमध्ये HAL सोबत करार केला होता. या डॉर्नियर विमानाचे पहिले व्यावसायिक उड्डाण आसाममधील दिब्रुगड आणि अरुणाचल प्रदेशातील पासीघाट दरम्यान मंगळवारी चालवले जाईल, असे एअरलाइनने सांगितले. व्यावसायिक उड्डाणासाठी स्वदेशी बनावटीचे विमान वापरण्याची ही पहिलीच वेळ असेल.
आतापर्यंत डॉर्नियर-228 विमानांचा वापर केवळ लष्करी उद्देशांसाठी केला जात आहे. या उड्डाणाच्या उद्घाटनाला नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिश्व शर्मा आणि अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्या याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून असणार आहे.
इतर बातम्या
Sanjay Raut : काश्मीर फाईलवाल्यांनी आता “भाग सोमय्या भाग” हा सिनेमा काढावा, राऊतांचा खोचक टोला