iPhone 15 : iPhone 15 वर भारताची मोहर! या कंपनीने सुरु केले उत्पादन

iPhone 15 : ॲप्पलच्या iPhone 15 वर भारताची मोहर उमटली आहे. या कंपनीने दक्षिणेतील या राज्यात उत्पादन सुरु केले आहे. आता जगभरात पोहचणाऱ्या नवीन लॉटमध्ये iPhone 15 वर Make In India अशी मोहर असेल.

iPhone 15 : iPhone 15 वर भारताची मोहर! या कंपनीने सुरु केले उत्पादन
Follow us
| Updated on: Aug 17, 2023 | 8:38 AM

नवी दिल्ली | 17 ऑगस्ट 2023 : ॲप्पलसाठी iPhone 15 चे भारतात उत्पादन सुरु झाले आहे. भारतात आयफोनची निर्मिती आणि उत्पादनावर जोर देण्यात येत आहे. पार्टची जोडणी करुन असेम्बलिंगचे काम सुरु आहे. पण उत्पादन आणि निर्मितीवर पण भर देण्यात येत आहे. जगभरातील कंपन्या चीनमधून काढता पाय घेत आहे. त्याचा फायदा भारतासह पूर्वेतील देशांना होत आहे. भारतात अनेक मोठ्या कंपन्यांनी राहुट्या टाकल्या आहेत. त्यासाठी करार पण झाले आहेत. आता उत्पादनाला सुरुवात झाली आहे. जगभरातील लोकांच्या हातात लवकरच Make In India ची मोहर असलेले iPhone 15 असतील. नवीन लॉटमध्ये भारतात तयार झालेल्या आयफोनचा मोठा वाटा असेल. सध्या हे प्रमाण कमी असले तरी जगातील आयफोन निर्यातीत भारताचा लवकरच दोन अंकी आकडा असेल.

या राज्यात निर्मिती

तैवानच्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजीस भारतात आयफोन 15 तयार करत आहे. ॲप्पलसोबत कंपनीचा करार झाला आहे. तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदुर शहरात नवीन प्रकल्प तयार करण्यात येत आहे. त्याची तयारी सुरु झाली आहे. पुढील महिन्यात iPhone 15 बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यावेळी कंपनीचे सीईओ टिम कुक यांच्या हातात Make In India iPhone 15 असेल.

हे सुद्धा वाचा

असेम्बलिंगचा पुढचा टप्पा

फॉक्सकॉन इंडिया यापूर्वी केवळ आयफोनचे असेम्बलिंग करत होती. गेल्या काही वर्षांपासून कंपनीने iPhone 14 चे उत्पादन भारतातून सुरु केले होते. त्यानंतर सातत्याने भारतात आयफोनचे उत्पादन वाढविण्यात येत आहे. आता पुढील टप्पा गाठण्यात येत आहे. iPhone 15 हा नवीन दमाचा स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे.

आयफोनच्या बाजारात भारताचा वाटा किती

जगभरात आयफोनचे उत्पादन काही देशात करण्यात येते. चीनमध्ये आयफोनचे सर्वाधिक काम होत होते. पण चीनमधून कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत आहे. कंपनीने भारताकडे मोर्चा वळवला आहे. भारतात आयफोन उत्पादन वाढत आहे. जगभरात उत्पादन होणाऱ्या एकूण आयफोन निर्यातीत 10,000 कोटी रुपयांचे आयफोन भारतातून निर्यात होत आहे. ॲप्पलच्या जगभरातील आयफोन निर्मितीत भारताचा वाटा सध्या 7 टक्के इतका आहे.

भारतात लागलीच मिळेल iPhone 15

यावेळी iPhone 15 ग्लोबल लॉचिंग सोबतच भारतातही लगेचच हा फोन उपलब्ध होण्याची आशा आहे. आयफोन चाहत्यांना त्यासाठी वाट पाहावी लागणार नाही. iPhone 15 खरेदीसाठी मोठी प्रतिक्षा करण्याची गरज नाही. भारतात ॲप्पलने दोन स्टोअर सुरु केले आहेत. त्यामुळे नवीन उत्पादित फोन लागलीच या स्टोअरमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.