नवी दिल्ली | 31 ऑक्टोबर 2023 : अभिनेत्री ते उद्योजिका असा शिल्पा शेट्टी कुंद्राचा प्रवास अनेक स्त्रीयांसाठी प्रेरणादायी आहे. मामाअर्थचा आयपीओ तिच्यासाठी लक्की ठरला. शिल्पाने या कंपनीत जवळपास 6 कोटींची गुंतवणूक केली होती. या आयपीओत शिल्पाने तिचा हिस्सा विक्री केला. तिने गुंतवणूक केल्याने तिला 1,393,200 शेअर मिळाले होते. हिस्सा विक्री केल्याने तिला 600 टक्क्यांनी अधिकचा फायदा होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. एका माहितीनुसार, मामाअर्थची मूळ कंपनी होनासा कंझ्युमर लिमिटेडने आयपीओ प्राईस ब्रँड 308-324 रुपये प्रति शेअर ठेवला आहे. या आयपीओत गुंतवणुकीची आज शेवटचा दिवस होता.
अशी केली गुंतवणूक
शिल्पा शेट्टीने मामाअर्थमध्ये 5.83 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यामोबदल्यात शिल्पा शेट्टी हिला जवळपास 1,393,200 शेअर मिळाले होते. यानुसार शिल्पा शेट्टी कुंद्राला प्रमोटर मानण्यात आले. त्यावेळी 41.86 रुपए प्रति शेअर असे मूल्य होते. आयपीओ लाँच झाल्यानंतर आता कंपनीचा शेअर सरासरी 315 रुपयांना विक्री होत आहे.
इतका झाला फायदा
जर शिल्पाच्या एकूण शेअरला 315 रुपयांनी गुणल्यास तिच्या खात्यात 43,88,58,000 रुपये जमा होतील. अर्थात हा केवळ अंदाज आहे. याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे याविषयीचा कोणताही दावा करता येत नाही. प्राईस ब्रँड 308—324 रुपया दरम्यान आहे. कदाचित शिल्पा शेट्टीला यापेक्षा अधिक फायदा मिळू शकतो.
आतापर्यंतची गुंतवणूक
क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी 1,57,44,820 शेअर राखीव ठेवण्यात आले होते. पण दुपारी एक वाजेपर्यंत कोणीही गुंतवणूक केली नाही. नॉन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदारांसाठी 78,72,409 शेअर राखीव ठेवण्यात आले. दुपारी एक वाजेपर्यंत 79,580 शेअरमध्ये गुंतवणूक करण्यात आली. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 52,48,272 शेअर राखीव ठेवण्यात आले होते. आज दुपारी एक वाजेपर्यंत 11,71,666 शेअरमध्ये गुंतवणूक करण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी 34,013 शेअर राखीव ठेवण्यात आले होते.
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.