लोढा देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर, 10,000, 20,000 की 30,000, लोढांची संपत्ती किती कोटी?

देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डर म्हणून भाजप आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha top in reach list) यांचा अव्वल क्रमांक लागला आहे.

लोढा देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर, 10,000, 20,000 की 30,000, लोढांची संपत्ती किती कोटी?
Follow us
| Updated on: Dec 10, 2019 | 10:25 AM

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डर म्हणून भाजप आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha top in reach list) यांचा अव्वल क्रमांक लागला आहे. आमदार मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha top in reach list) हे देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर ठरले आहेत. लोढा यांची संपत्ती थोडी थोडकी नाही तर तब्बल 31 हजार 960 कोटी रुपये इतकी आहे. श्रीमंत बिल्डर्सच्या यादीत लोढा अव्वल स्थानी तर डीएलएफ कंपनीचे राजीव सिंह दुसऱ्या तर एम्बेसी ग्रुपचे संस्थापक जितेंद्र विरवानी तिसऱ्या स्थानावर आहेत.

हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडिया यांचा सर्वेक्षण अहवाल ‘ग्रोही हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट 2019’ (Grohe Hurun India Real Estate Rich List for 2019)  हा प्रसिद्ध झाला. या रिपोर्टमध्ये देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांची यादी जाहीर करण्यात आली.

या रिपोर्टनुसार, लोढा  परिवाराची एकूण संपत्ती 31,960 कोटी रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलं. 2019 मध्ये लोढा परिवाराची संपत्ती 18 टक्क्यांनी वाढली. शंभर जणांच्या यादीत अन्य 99 जणांपेक्षा 12 टक्के संपत्तीचा भाग एकट्या लोढांकडे आहे.

दुसऱ्या क्रमांकावरील डीएलएफचे राजीव सिंह यांची संपत्ती 25 हजार 80 कोटी रुपये आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ते श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते.

एम्बेसी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट्सचे जितेंद्र विरवानी हे 24 हजार 750 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

बिल्डरांच्या या संपत्तीचं विवरण 30 सप्टेंबर 2019 पर्यंतच्या संपत्तीवरुन करण्यात आलं आहे.

देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर्स – संपत्ती कोटीमध्ये  

मंगल प्रभात लोढा लोढा डेव्हलपर्स ३१,९६०
राजीव सिंग ‘डीएलएफ’ २५,०८०
जितेंद्र विरवाणी एम्बॅसी समूह २४,७५०
डॉ. निरंजन हिरानंदानी हिरानंदानी समूह १७,०३०
चंद्रू रहेजा के.रहेजा १५,४८०
विकास ओबेरॉय ओबेरॉय रियल्टी १३,९१०
राजा बागमाने बागमाने डेव्हलपर्स ९,९६०
सुरेंद्र हिरानंदानी हाऊस ऑफ हिरानंदानी, सिंगापूर ९,७२०
सुभाष रुणवाल रुणवाल डेव्हलपर्स ७,१००
१० अजय पिरामल पिरामल रियल्टीज ६,५६०
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.