Market capitalization : मार्केट कॅपमध्ये 1.91 लाख कोटींची वाढ, बजाज नफ्यात; एलआयसीचा तोटा

बजाज फायनान्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या गंगाजळीत सर्वाधिक भर पडली. गेल्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर निर्देशांकात 1,498.02 अंकांच्या वाढीसह 2.67 टक्क्यांची भर पडली.

Market capitalization : मार्केट कॅपमध्ये 1.91 लाख कोटींची वाढ, बजाज नफ्यात; एलआयसीचा तोटा
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 8:06 PM

नवी दिल्ली : शेअर बाजारातील (Share Market this week) गेल्या आठवड्यांत काही कंपन्यांच्या गंगाजळीत मोठ्या प्रमाणात भर पडली. सेन्सेक्स वरील टॉप-10मधील आठ कंपन्यांचा मार्केट कॅपमध्ये (Market cap) 1,91,622.95 कोटी रुपयांची वाढ नोंदविली गेली. बजाज फायनान्स आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या गंगाजळीत सर्वाधिक भर पडली. एलआयसीला मात्र तोटा झाला आहे. गेल्या आठवड्यात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर निर्देशांकात 1,498.02 अंकांच्या वाढीसह 2.67 टक्क्यांची भर पडली. बजाज फायनान्सचा (Bajaj Finance) मार्केट कॅप 57,673.19 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,36,447.88 वर पोहोचला. टीसीएसच्या मार्केट कॅप मध्ये 47,494.49 कोटींची वाढ झाली आणि मार्केट कॅप 12,07,779.68 कोटींवर जाऊन पोहोचला.

आकडे बोलतात..

एचडीएफसी बँकेचा मार्केट कॅप गेल्या आठवड्यात 23,481.09 रुपयांच्या वाढीसह 7,97,251.18 कोटी रुपयावर पोहोचला. इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये देखील वाढ दिसून आली. इन्फोसिसच्या मार्केट कॅपमध्ये 18,219 कोटी रुपयांची वाढ नोंदविली गेली. इन्फोसिसचा मार्केट कॅप 6,52,012.91 कोटी रुपयांवर पोहोचला. एचडीएफसीच्या मार्केट कॅपमध्येही वाढ झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात मार्केट कॅप 14,978.42 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,31,679.65 वर पोहोचला. भारतीय स्टेट बँक (SBI) चा मार्केट-कॅप 12,940.69 कोटी रुपयांच्या वाढीसह 4,71,397.99 कोटीवर पोहोचला.

टॉप 10 कंपन्या

सेन्सेक्स टॉप-10 कंपन्यांच्या सूचीत रिलायन्स इंडस्ट्रीजं स्थान पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एसबीआई, बजाज फायनान्स, एचडीएफसी आणि एलआयसी असा क्रम राहिला आहे.

हे सुद्धा वाचा

मार्केट कॅप म्हणजे काय?

“मार्केट कॅप” हा मार्केट कॅपिटलायझेशन या शब्दाचं संक्षिप्त स्वरूप आहे. मराठीमध्ये ‘समग्र बाजारमूल्य’ म्हणूनही हा शब्द वापरला जातो. रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप 17 लाख कोटींहून अधिक आहे. म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सर्व शेअर्सची एकूण बाजारातली किंमत 10 लाख कोटींपेक्षा अधिक असल्याचा अर्थ ध्वनित होतो.

प्रमुख कंपन्यांचे मार्केट कॅप

  1. रिलायन्स इंडस्ट्रीज 16,97,208.18 कोटी
  2. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 12,07,779.68 कोटी
  3. इन्फोसिस 6,52,012.91 कोटी
  4. एचडीएफसी बँक 7,97,251.18 कोटी
  5. स्टेट बँक ऑफ इंडिया 4,71,397.99 कोटी
  6. आयसीआयसीआय बँक 5,69,400.43 कोटी
  7. हिंदुस्थान युनिलिव्हर 6,19,551.97 कोटी
  8. एलआयसी 4,28,739.97 कोटी
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.