Maruti Suzuki : जोरदार नफ्यात किती असेल तुमचा वाटा, आता मारुती सुझुकीचा शेअर किती धावणार
Maruti Suzuki : मारुती सुझुकीने तिमाहीत बक्कळ कमाई केली खरी, आता गुंतवणूकदारांना त्याचा काय फायदा होईल.
नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार कंपनी Maruti Suzuki ने बुधवारी, 26 एप्रिल रोजी चौथ्या तिमाहीचे निकाल आले आहेत. चौथी तिमाहीच्या निकालानंतर आता दिग्गज ब्रोकरेज फर्म्सने या शेअरविषयी अजून चांगला अंदाज वर्तविला आहे. आता बाजारात गुंतवणूकदारांची नजर या शेअरवर टिकली आहे. सध्या बाजारात हा शेअर जवळपास नरमाईने मार्गाक्रमण करत आहे. मार्चच्या तिमाहीत (March Quarter Result) मारुती सुझुकीने बक्कळ कमाई केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. वार्षिक आधारावर मारुती सुझुकीच्या नफ्यात 43% वाढ होऊन तो 2,623 कोटी रुपये झाला आहे.
इतका झाला फायदा चौथ्या तिमाहीत कंपनीला 2,772 कोटी रुपयांचा नफा झाला. कंपनीच्या अंदाज गाठायला या निकालाला जमले नाही. अंदाजापेक्षा हा नफा थोडा कमी राहिला. कंपनीची वार्षिक उलाढाल पहिल्यांदाच 1 लाख कोटींपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या व्यापारी वर्षांत 2022 मध्ये कंपनीला 88,000 कोटी रुपये टर्नओव्हर झाला होता. मार्च तिमाहीत या कार कंपनीला वार्षिक आधारावर 20% वाढ होऊन ती 32,048 कोटी रुपये होईल.
परदेशी ब्रोकरेज संस्थेचा अंदाज मारुती सुझुकीची कार सूसाट असल्याने यंदा गुंतवणूकदारांना चांगली कमाई करता येईल. परदेशी ब्रोकरेज संस्थांनी पण मारुती सुझुकीच्या शेअरबाबत गुंतवणूकदारांना अस्वस्थ केले आहे. काही संस्थांनी मात्र मारुतीच्या शेअरविषयी मोठा अंदाज वर्तविला आहे. त्यांच्या मते या कंपनीचा प्रति शेअर 11,155 रुपये लक्ष्य निर्धारीत केले आहे. पुढील वर्षांसाठी 2024 साठी या कंपनीचा फायदा 8.1% राहण्याचा अंदाज आहे. गेल्या 18 महिन्यांत हा फायदा सर्वाधिक आहे. ब्रोकरेज फर्मच्या अंदाजानुसार, वर्ष 2024 मध्ये कंपनीची कामगिरी अगदी जोरदार असेल.
अशी बजावली कामगिरी ब्रोकरेज फर्मने मारुती सुझुकीचा शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. प्रती शेअर 11,000 रुपये लक्ष्य गाठेल, असा अंदाज व्यक्त होत आहे. ब्रोकरेज फर्मने दिलेल्या अहवालानुसार, चौथ्या तिमाहीत कंपनीचा वॉल्यूम वार्षिक आधारावर 5% वाढेल. तर EBITDA आणि नफ्यात जवळपास 38-43% वाढ होऊ शकते. हे वर्ष कंपनीसाठी जोरदार असल्याचा अंदाज आहे.
काही ब्रोकरेज फर्मने 10,800 रुपये प्रति शेअरचे लक्ष्य ठेवले आहे. चौथ्या तिमाहीत या कंपनीने जोरदार कामगिरी बजावली आहे. कंपनीचा अंदाजापेक्षा नफा किंचित कमी असला तरी हे वर्ष आणि पुढील वर्षात कंपनीची कामगिरी चांगली असेल, असा ब्रोकरेज कंपनीने अंदाज वर्तविला आहे.
ही केवळ कंपनीच्या कारभाराची, कामगिरीची माहिती आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.