मारुती सुझुकीची वाहने महागणार, कच्चा माल महागल्याने दरवाढीचा निर्णय, ग्राहकांना मोजावे लागणार अतिरिक्त पैसे

ऑटो क्षेत्रातील (Auto) देशाती सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki India)आपल्या विविध मॉडेलच्या कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर मारुती सुझुकीचे वाहन खरेदी करायचे असेल तर अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.

मारुती सुझुकीची वाहने महागणार, कच्चा माल महागल्याने दरवाढीचा निर्णय, ग्राहकांना मोजावे लागणार अतिरिक्त पैसे
मारुती सुझुकीच्या वाहनाची किंमत वाढणार
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 12:55 PM

ऑटो क्षेत्रातील (Auto) देशाती सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki India)आपल्या विविध मॉडेलच्या कारची किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता तुम्हाला जर मारुती सुझुकीचे वाहन खरेदी करायचे असेल तर अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत. वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या (Raw material) किमती गेल्या एक वर्षांपासून सातत्याने वाढत आहेत. त्यात युक्रेन, रशिया युद्धामुळे आणखीनच भर पडली आहे. अशा परिस्थितीमध्ये पूर्वीच्या किमतीत वाहन विक्री करणे परवडत नाही, त्यामुळे वाहनाच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे. ग्राहकांना लवकरच या दरवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र मारुती सुझुकी आपल्या वाहनांच्या किमतीमध्ये किती टक्के वाढ करणार याबाबत कोणताही खुलासा अद्याप करण्यात आलेला नाहीये.

मार्च महिन्यात वाहनाच्या विक्रीत घट

मार्च महिन्यात मारुती सुझुकीच्या वाहनांच्या विक्रीमध्ये घट नोंदवण्यात आली आहे. मार्च महिन्यात देशातंर्गत वाहनाच्या विक्रीत सात टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या मार्च महिन्यात कंपनीच्या केवळ 1,43,899 युनिटचीच विक्री झाली आहे. मार्च 2021 मध्ये देशातंर्गत वाहनाची विक्री 1,55,417 युनिट इतकी राहिली होती. याचाच अर्थ वाहनाच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षभरापासून वाहन निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याचा मोठा फटका हा वाहन उद्योग कंपन्यांना बसल्याचे समोर आले आहे.

देशात सेमीकंडक्टरचा तुटवडा

देशात सेमीकंडक्टरचा मोठ्याप्रमाणात तुटवडा आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्याचा परिणाम हा वाहन उद्योगावर होताना दिसून येत आहे. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन निर्मितीच्या प्रमाणात घट झाली आहे. सेमीकंडक्टरची पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने प्रचंड प्रमाणात दरवाढ झाली आहे. यामुळे मारुती सुझुकीप्रमाणेच इतर कंपन्या देखील लवकरच आपल्या वाहनाच्या किमतीमध्ये वाढ करणार असल्याचे संकते मिळत आहेत. गेले दोन वर्ष जगावर कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात उद्योग बंद असल्याने वाहन उद्योगाला यांचा मोठा फटका बसला आहे. आता निर्बंध हटवण्यात आल्यामुळे वाहनांच्या किमती काही प्रमाणात वाढवून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा प्रयत्न वाहन निर्मिती कंपन्यांकडून सुरू आहे.

संबंधित बातम्या

गाडीत पेट्रोल टाकू की गाडीवर ! दरवाढीने महागाईचा आगडोंब, चांद्यापासून बाद्यांपर्यंत इंधन दरवाढीने वातावरण कमालीचे तापले

Fact Check | घर भाडे आणि दुकानावर 12 टक्के जीएसटी आकारणार नाही, तुम्हीसुद्धा या अफवेने एप्रिल फूल?

LIC IPO : एलआयसी आयपीओचा अखेर मुहूर्त लागला, मे महिन्यातील ‘या’ तारखेला येणार IPO, केंद्र 7 टक्के भागीदारी विकणार?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.