Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रित घट, टाटा मोटर्सची विक्री 27 टक्क्यांनी वाढली

देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) वाहन विक्रीत चालू आर्थिक वर्षामध्ये काहीप्रमाणात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये मारुती सुझुकीच्या एकूण 1,64,056 वाहानाची (Vehicles) विक्री झाली. तर हेच प्रणाण गेल्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी (February) महिन्यात 1,64,469 इतके होते.

मारुती सुझुकीच्या वाहन विक्रित घट, टाटा मोटर्सची विक्री 27 टक्क्यांनी वाढली
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 7:14 AM

नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी कार निर्मिती कंपनी मारुती सुझुकीच्या (Maruti Suzuki) वाहन विक्रीत चालू आर्थिक वर्षामध्ये काहीप्रमाणात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये मारुती सुझुकीच्या एकूण 1,64,056 वाहानाची (Vehicles) विक्री झाली. तर हेच प्रणाण गेल्या आर्थिक वर्षात फेब्रुवारी (February) महिन्यात 1,64,469 इतके होते. याचाच अर्थ मारुती सुझुकीच्या वाहन विक्रीत चालू वर्षात 8.46 टक्क्यांची घट झाली आहे. याबाबत बोलताना कंपनीच्या वतीने सांगण्यात आले की, चालू आर्थिक वर्षात वर्षभर सेमीकंडक्टरचा तुटवडा कायम राहिला. सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे वाहन निर्मितीमध्ये घट झाली. वाहन निर्मिती घटल्याने त्याचा परिणाम हा विक्रीवर झाला. त्यामुळे यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाहन विक्रीत 8.46 टक्क्यांची घट झाली. दुसरीकडे 2021 मध्ये देखील कोरोना संकट कायम होते. त्यामुळे अनेकांनी वाहन खरेदी टाळल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

टाटा मोटर्सच्या विक्रीत वाढ

मात्र दुसरीकडे टाटा मोटर्सच्या वाहन विक्रीमध्ये वाढ झाली आहे. टाटा मोटर्सने दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात त्यांच्या वाहन विक्रीमध्ये 27 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांच्या एकूण 58,366 वाहनांची विक्री झाली होती. तर यंदा फेब्रुवारीपर्यंत 73,875 वाहनांची विक्री झाल्याची माहिती कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे, विशेष: टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांना ग्राहक अधिक पसंती देत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी वाहनाच्या विक्रीत 47 टक्के वाढ झाली आहे.

हुंडई मोटर्सची विक्री 14 टक्क्यांनी घटली

हुंडई मोटर्सच्या वाहन विक्रीत देखील घट झाली आहे. हुंडई मोटर्सने मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात त्यांच्या वाहन विक्रित 14 टक्क्यांची घट झाली. चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या एकूण 53,159 वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात फेब्रुवारीपर्यंत कंपनीच्या एकूण 61,800 वाहनांची विक्री झाली होती. याचाच अर्थ वाहन विक्री 14 टक्क्यांने कमी झाल्याचे समोर आले आहे. सेमीकंडक्टरचा वेळेत न होणारा पुरवठा हे वाहन विक्री घटण्या मागचे प्रमुख कारण असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Nashik | प्रभाग रचनेचा अहवाल आज निवडणूक आयोगाकडे सादर; ओबीसी आरक्षण निकालाचा काय होणार परिणाम?

खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकरांनी निकटवर्तीयाला फसवले, आर्थिक व्यवहारातून कोट्यावधी रूपयाला फसवण्याचा आरोप

Sarojini Naidu Memorial Day : ‘भारताच्या कोकिळा’ सरोजिनी नायडू यांचा आज स्मृतिदिन

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.