Budget 2020 : इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता, कुणाला किती फायदा
केंद्रीय अर्थमंत्री येणाऱ्या 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये मोठे बदल करणार असल्याची शक्यता (Income tax slab deduction) आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री येणाऱ्या 1 फेब्रुवारीच्या बजेटमध्ये इन्कम टॅक्सच्या स्लॅबमध्ये मोठे बदल करणार असल्याची शक्यता (Income tax slab deduction) आहे. इन्कम टॅक्सच्या समितीने काही शिफारशी तयार केल्या आहेत. या शिफारशींना जर हिरवा झेंडा मिळाला तर इन्कम टॅक्समध्ये मोठे बदल होऊ (Income tax slab deduction) शकतात, असं म्हटलं जात आहे.
ज्या कर्मचाऱ्यांचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपये आहे त्यांच्यासाठी पाच टक्के टॅक्स लावण्यात यावा, असा प्रस्ताव समितीने अर्थमंत्रालयाला दिला आहे. तर सध्या पाच लाख रुपये वार्षिक उत्पन्न असेल्या कर्मचाऱ्यांवर पाच टक्के टॅक्स लावला जात आहे. तसेच सात, 10 किंवा 12 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्यांवर 10 टक्के टॅक्स असावा असा प्रस्ताव आहे. सध्या 5 ते 10 लाख वार्षिक उत्पन्न असलेल्यांवर 20 टक्के टॅक्स लावला जात आहे.
10 ते 20 लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के टॅक्सचा प्रस्ताव आहे. सध्या 10 लाख रुपये ते त्यापेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स लावला जात आहे. तर 20 लाख ते 10 कोटी रुपये वार्षित उत्पन्नावर 30 टक्के प्रस्ताव आहे. याशिवाय 10 कोटींपेक्षा अधिक वार्षिक कमाई असलेल्यांवर 35 टक्के टॅक्स लावला पाहिजे असा प्रस्ताव आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
बजेटपूर्वी इन्कम टॅक्समध्ये बदल करणाऱ्या समितीने अर्थमंत्रालयाला आपला अहवाल सोपवला आहे. कॉर्पोरेट टॅक्समध्ये घट केल्यास लो मिडल क्लास आणि मिडल क्लास वर्गाला सूट मिळेल. तसेच इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्याची गरज आहे. खालच्या स्लॅबमध्ये बदल केल्यास लो मिडल वर्गाला दिलासा मिळू शकतो.