एअर इंडिया विक्रीच्या निर्णयाबाबत सावळागोंधळ, गावभर चर्चा झाल्यानंतर सरकार म्हणते अजून निर्णय झालाच नाही

अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल, असे निर्गुंतवणूक मंत्रालयाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले. त्यामुळे एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

एअर इंडिया विक्रीच्या निर्णयाबाबत सावळागोंधळ, गावभर चर्चा झाल्यानंतर सरकार म्हणते अजून निर्णय झालाच नाही
एअर इंडिया
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 2:16 PM

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी सरकारी हवाई कंपनी असलेल्या एअर इंडियाच्या विक्रीबाबत अद्यापही घोळ सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळपासून एअर इंडियाच्या खरेदीसाठी टाटा समूहाने दाखल केलेलेय निविदेला केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची चर्चा होती. मात्र, काहीवेळापूर्वीच केंद्रीय निर्गुंतवणूक मंत्रालयाच्या सचिवांनी ट्विटवरुन असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्प्ष्ट केले. अंतिम निर्णय झाल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्याविषयी माहिती दिली जाईल, असे निर्गुंतवणूक मंत्रालयाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी सांगितले. त्यामुळे एअर इंडियाच्या खासगीकरणाबाबतचा संभ्रम अजूनही कायम आहे.

जेआरडी टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्स कंपनी स्थापन केली होती. मात्र, काँग्रेस सरकारच्या काळात या कंपनीचे सार्वजनिकीकरण झाले होते. त्यामुळे कंपनीचे नाव बदलून एअर इंडिया असे करण्यात आले होते. मात्र, आज 68 वर्षांनंतर ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समूहाच्या ताब्यात जाण्याची शक्यता आहे.

टाटा सन्सबरोबरीनेच, स्पाइसजेटचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग हे स्पर्धेत होते. टाटा समूहाने एअर इंडियाच्या खरेदीसाठी तब्बल 5000 कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले जाते. एअर इंडियासाठी विक्रीसाठी लावण्यात आलेल्या आर्थिक बोलीत 85 टक्के हिस्सा हा कंपनीवरील कर्जदायित्वासाठी, तर 15 टक्के हा रोख रूपात सरकारी तिजोरीत येण्याचे अंदाजण्यात येत आहे. एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात गेल्यास आता मरगळ आलेल्या भारतीय हवाई सेवा क्षेत्रात चैतन्य संचारण्याची शक्यता आहे.

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 मध्ये सुरू

निर्गुंतवणुकीची प्रक्रिया जानेवारी 2020 पासून सुरू झाली होती ती कोविड 19 महामारीमुळे स्थगित झाली. सरकारने संभाव्य बोलीदारांना एप्रिल 2021 मध्ये आर्थिक बोली सादर करण्यास सांगितले होते. 15 सप्टेंबर हा निविदा सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. टाटा समूह अशा कंपन्यांपैकी एक होता ज्यांनी डिसेंबर 2020 मध्ये एअरलाइन खरेदी करण्यासाठी इंटेलिशन एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) दिला होता.

एअर इंडिया 2007 पासून तोट्यात

2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,400 देशांतर्गत आणि 1,800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट तसेच परदेशी विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल. याव्यतिरिक्त कंपनीला एअरलाइनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATS ची 50 टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

संबंधित बातम्या:

67 वर्षांनंतर एअर इंडिया टाटा पुन्हा घेणार?, अधिग्रहणासाठी लावली बोली

कर्मचाऱ्यांकडूनच ‘एअर इंडिया’ विकत घेण्याची तयारी; एक-एक लाख रुपयांची वर्गणी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.