Fixed Deposite schemes: फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे टाकताय, मग सावध राहा; अन्यथा आयकर विभागाची कारवाई
सध्या लोकांना अशा नोटीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. | Fixed Deposite Income Tax
मुंबई: हमखास आणि खात्रीशीर उत्पन्नाचा पर्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुदत ठेव योजनांच्या (Fixed Deposite schemes) माध्यमातून मिळणाऱ्या व्याजावर कर भरावा लागतो, ही गोष्ट अनेकांना माहिती नसते. त्यामुळे अनेक लोक आयकर परताव्यासाठीचा (ITR) अर्ज भरताना त्यामध्ये व्याजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न दाखवत नाहीत. मात्र, आता अशा लोकांना आयकर विभागाच्या (Income Tax) कारवाईला सामोरे जावे लागू शकते. (Income Tax department will send you notice if Fixed Deposit schemes interest not mentions in ITR)
या एका चुकीमुळे तुम्हाला आयकर विभागाची नोटीस येऊ शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आयकर विभागाने पडताळणी केल्यानंतर ITR मधील माहिती आणि व्याज धरून असलेली तुमची प्रत्यक्ष कमाई यामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे आता आयकर विभागाकडून अशा लोकांना नोटीस पाठवल्या जात आहेत.
‘मिंट’ दैनिकाच्या माहितीनुसार सध्या लोकांना अशा नोटीस येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ITR भरताना व्याजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न नमूद न करण्याची चूक नागरिकांनी टाळली पाहिजे, असे जाणकारांनी सांगितले.
आयकर विभागाची कारवाई टाळण्यासाठी काय कराल?
आयकर विभागाचा ससेमिरा टाळण्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नचा अर्ज भरताना त्यामध्ये व्याजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न नमूद करा. ITR मध्ये हे उत्पन्न कशाप्रकारे दाखवायचे, हेदेखील तुम्हाला माहिती असले पाहिजे. तुम्ही ही माहिती योग्यप्रकारे भरलीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
ज्येष्ठ नागरिकांना लाभ
ज्येष्ठ नागरिकांना व्याजाच्या माध्यमातून मिळणाऱ्या 50 हजारापर्यंतच्या उत्पन्नावर कर लागत नाही. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना याची माहिती आयकर विवरणपत्रात द्यावी लागते. ITR मध्ये ‘इनकम फ्रॉम अदर सोर्सेस’ या रकान्यात व्याजाच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न नमूद करावे.
पोस्टात 2850 रुपये जमा करा आणि 20 वर्षांनंतर मिळवा 14 लाख
टपाल कार्यालयाच्या वतीने ग्रामीण लोकांचा विमा उतरविण्याच्या उद्देशाने 1995 मध्ये ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स RPLI सुरू केली गेली. इंडिया पोस्ट वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार 31 मार्च 2017 पर्यंत 146 लाख पॉलिसी उतरवण्यात आलीत. RPLI लोकांच्या विविध गरजा लक्षात घेऊन 6 प्रकारच्या विमा पॉलिसी ऑफर करते.
ग्राम सुमंगल ही मनी बॅक विमा पॉलिसी आहे. याची जास्तीत जास्त रक्कम 10 लाख रुपये आहे. जर आपल्याला वेळोवेळी परतावा हवा असेल तर ही योजना एक उत्तम पर्याय आहे. जोपर्यंत विमाधारक जिवंत आहे, तोपर्यंत त्याला वेळोवेळी मनीबॅकचा लाभ मिळतो. विमाधारकाचा मृत्यू झाल्यास नॉमिनी व्यक्तीस एकूण विम्याची रक्कम आणि बोनस मिळेल. या पॉलिसीअंतर्गत 20 वर्षांपर्यंत 2850 रुपये प्रीमियम जमा केल्यास सुमारे 14 लाख रुपये मिळतील.
संबंधित बातम्या:
Government Employee Salary Hike : 7 लाख सरकारी कर्मचाऱ्यांची लॉटरी लागणार, मेपासून नशिब उजळणार
LIC च्या ‘या’ योजनेत 23000 पेन्शन मिळवण्यासाठी जमा करा 3 लाख, 10 वर्षांनंतर पैसेसुद्धा परत मिळणार
(Income Tax department will send you notice if Fixed Deposite schemes intrest not mentions in ITR)