मुंबईकरांसाठी आनंदवार्ता; म्हाडाच्या २१४७ घरांची लॉटरी, या दिवशी पूर्ण होणार घराचे स्वप्न
MHADA Home Lottery : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करून देत आहे. या दिवशी मुंबईकरांना स्वस्त घराची लॉटरी लागणार आहे.

मायानगरीत स्वतःचं हक्काच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात येणार आहे. मुंबईकरांना स्वस्तात स्वतःचा आशियाना खरेदी करता येईल. मध्यमवर्गीयांच्या खिशाला परवडणारे घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. म्हाडा त्यांना परवडणाऱ्या किंमतीत घर उपलब्ध करून देत आहे. या दिवशी मुंबईकरांना स्वस्त घराची लॉटरी लागणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईकरांनी ही लॉटरी लागणार आहे.
फेब्रुवारीत म्हाडाची लॉटरी
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीची लॉटरी ५ फेब्रुवारी लागेल. दुपारी १ वाजता सोडत निघेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घराची लॉटरी लागेल. ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात संगणकीय सोडत आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.




२४,९११ अर्जांमधून कुणाला लागणार लॉटरी?
कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका व ११० भूखंड विक्रीकरिता सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर रोजी प्रारंभ करण्यात आला
मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदारांना ६ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली. ७ जानेवारी रोजी रात्री ११.५९ पर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन व संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS/NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत होती.
तीनवेळा सोडत पुढे ढकलली, आता लागला मुहूर्त
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ५ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती ठाण्यात सोडत काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या २२६४ घरांसाठी तीन वेळा पुढे ढकलण्यात आलेल्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. त्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.