आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल दरवाढीची नाही चिंता; इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चर्चा, म्हणाले अजून दोनच वर्ष थांबा…

Electric Vehicle : केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. सध्या देशात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती आणि वापराला केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. पण या वाहनाच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे...

आनंदवार्ता, पेट्रोल-डिझेल दरवाढीची नाही चिंता; इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतीबाबत नितीन गडकरी यांच्या वक्तव्याची चर्चा, म्हणाले अजून दोनच वर्ष थांबा...
नितीन गडकरी यांची मोठी घोषणा
Follow us
| Updated on: Sep 10, 2024 | 3:33 PM

केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दोन वर्षांच्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमतींबाबत मोठं वक्तव्य केले आहे. इलेक्ट्रिक वाहनांनी निर्मिती आणि वापराला केंद्र सरकार सातत्याने प्रोत्साहन देत आहे. या वाहन उत्पादकांना सबसिडी पण देण्यात येत आहे. गडकरी यांनी या वाहनांना सबसिडी सुरू ठेवण्यास अडचण नसल्याचे सांगितले. येत्या 2 वर्षात इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती या पेट्रोल आणि डिझेल वाहना इतक्या असतील असा दावा केला आहे.

गडकरी यांचा दावा काय?

यापूर्वी नितीन गडकरी यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना सबसिडी देण्याची गरज नाही असा दावा केला होता. निर्मिती खर्च कमी झाल्याने त्यांनी हे वक्तव्य केले होते. ग्राहक इलेक्ट्रिक वाहन वा सीएनजी वाहन खरेदी करु शकतात, असा दावा त्यांनी केला होता. आपण इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला प्रोत्साहन देण्याच्या विरोधात नाही. इलेक्ट्रिक कारवर इन्स्टेटिव्ह देण्याच्या मी विरोधात नाही. उत्पादन वाढीला लागले आहे. सबसिडी विना उत्पादन वाढवण्यावर त्यांनी जोर दिला.

हे सुद्धा वाचा

इलेक्ट्रिक वाहन सहजरित्या उपलब्ध होत आहे. माझे मत असे आहे की, दोन वर्षात इलेक्ट्रिक वाहनाच्या किंमती पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या किंमती इतकी होईल. त्यामुळे या ईव्हींना सबसिडी आवश्यकता नाही. इंधन रुपात इलेक्ट्रिक असल्याने खर्चाची बचत अगोदरच होईल.

इलेक्ट्रिक कार बाजारपेठ बदलेल

देशातील इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ दोन वर्षात पूर्णपणे बदलेल, कारण बॅटरी आणि चिप या दोन्हीच्या किंमतीत मोठी घसरण होईल. एका किलोवॅट पॉवर बॅटरीची किंमत 2021 मध्ये 10,850 रुपये होती. आता ती 8,350 रुपयांवर आली. तर पुढील वर्षात 2025 मध्ये एका किलोवॅटचा खर्च 6,650 रुपये येणार आहे. ईव्हीसाठी सर्वात जास्त खर्च बॅटरीचा येतो. बॅटरीसाठी 70 टक्के खर्च येतो. हा खर्च आता वाचल्याने ईव्हींच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. 10 लाखांच्या ईव्हीची किंमत पुढील वर्षांपर्यंत 7 लाख रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. सबसिडी दिल्यास या किंमती अजून कमी होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ
युगेंद्र पवार यांच्या सभेत शरद पवार यांची रॉयल एन्ट्री... बघा व्हिडीओ.
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच...
अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली? दादा काय म्हणाले? एकदा बघाच....
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?
दादागिरी वाढली तर उघडावा लागतो तिसरा डोळा अन्...कोल्हेंचा रोख दादांवर?.
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी
अजित पवारांच्या बारामतीच्या सांगता सभेला; दादांच्या आईंनी लावली हजेरी.
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली
थडग्यावर चादर चढवणारा.., मराठा मोर्चाची कालीचरण महाराजांकडून खिल्ली.
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'
'जर ती गोष्ट राज ठाकरे करत असेल तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?'.
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्...
एक है तो सेफ है घोषणेवरून राहुल गांधींचा निशाणा, थेट तिजोरी ओपन अन्....
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई
एका मताला 500 रूपये...मतदारसंघात पैशांचं वाटप करणाऱ्याची चांगलीच धुलाई.
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात
'...तर चुकीचे काय? पवारांमधला जातीवाद उफाळून येतो', फडणवीसांचा घणाघात.
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय...
पवारांमुळे राष्ट्रपती राजवट लागली? फडणवीस म्हणाले, 100 टक्के खरंय....