Mission Gaganyaan | चंद्र आणि सूर्यानंतर गगनयानची तयारी, चंद्रयानपेक्षा इतकी महाग आहे मोहिम

Mission Gaganyaan | चंद्रयान आणि सूर्यावरील आदित्य एल 1 मोहिमेने भारताची मान उंचावली आहे. आता मानवासहित अंतराळ मोहिम राबविण्याची चाचपणी करण्यात येत आहे. त्यासाठी गगनयान ही मोहिम राबविण्यात येत आहे. सुरुवातीचे टप्पे केवळ चाचणी असेल. या मोहिमेचा खर्च चंद्र आणि सूर्यावरील मोहिमेपेक्षा अधिक आहे.

Mission Gaganyaan | चंद्र आणि सूर्यानंतर गगनयानची तयारी, चंद्रयानपेक्षा इतकी महाग आहे मोहिम
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 9:30 AM

नवी दिल्ली | 21 ऑक्टोबर 2023 : चंद्रयान आणि आदित्य एल 1 मोहिमेने भारताच्या आशा बळकट झाल्या आहेत. अंतराळातील घडामोड भारताला खुणावत आहे. मानवासहित अंतराळात सफर करण्याचे भारतीयांचे स्वप्न गगनयान मोहिमेतून पूर्ण होणार आहे. गगनयान मोहिम ही पहिली मोठी चाचणी आहे. यापूर्वीच्या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्यानंतर गगनयानची चाचपणी करण्यात येत आहे. इस्त्रोने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. अर्थात चंद्रयान आणि सूर्यावरील आदित्य एल 1 मोहिमेपेक्षा गगनयान मोहिमेचा खर्च अफाट आहे. या मोहिमेसाठी भारताला इतका खर्च आला आहे.

मिशन गगनयान आहे तरी काय?

गगनयान हे भारताचे पहिले Human Space Mission आहे. हे मिशन तीन दिवसांचे असेल. यामध्ये तीन सदस्य असतील. त्यांना पृथ्वीच्या कक्षेत 400 किमीवर पाठविण्यात येईल. त्यानंतर या सदस्यांना सुरक्षितपणे समुद्रात उतरविण्यात येईल. यात यश आले तर अमेरिका, चीन आणि रशियानंतर अशी कामगिरी करणारा भारत हा चौथा देश असेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार गगनयान मोहिमेसाठी जवळपास 90.23 अब्ज रुपये देण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

या मोहिमेतून काय साध्य होणार

भारताच्या गगनयान मोहिम यशस्वी झाल्यास भारतीय अंतराळवीरांना अंतराळाचा अभ्यास, संशोधन आणि अंतराळाचे वातावरण समजून घेण्याची संधी मिळेल. या मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात भारताला मोठी झेप घेता येईल. तसेच इतर मोहिमांना पण त्याचा फायदा होईल. या मोहिमेमुळे जागतिक स्तरावर भारताचा दबदबा तयार होईल. अशी मोहिम राबविणारा भारत चौथा देश ठरेल.

चंद्रयानपेक्षा मोहिम किती महाग?

अंदाजानुसार गगनयान मोहिम, चंद्रयान 3 पेक्षा 14 पट महाग असेल. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, गगनयान मिशन जवळपास 9023 कोटी रुपये खर्चाचा अंदाज आहे. तर चंद्रयान 3 मिशनासाठी 650 कोटी रुपयांचा खर्च आला होता. तर इस्त्रोच्या मिशन आदित्य L1 चे बजेट 400 कोटी रुपये होते.

अंतराळवीरांची वसाहत ;

2030 पर्यंत चंद्रावर 40 तर पुढील 10 वर्षांत, 2040 पर्यंत एक हजारांहून अधिक अंतराळवीर चंद्रावर वस्ती करतील. त्यांची चंद्रावर वसाहत असेल. पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवात जसे संशोधन सुरु आहे. तसेच संशोधन प्रकल्प तिथे सुरु होतील. मानवी वसाहतीच्या दृष्टीने पाणी गवसल्यास मोठा फायदा होईल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.