आकड्यांबरोबर चांगल्या पद्धतीने खेळायची भाजपची खासियत : रोहित पवार
छोट्या शेतकऱ्यांसाठी जर ती मदत जाणार असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्याचं स्वागतचं करेल," असेही रोहित पवार (Rohit Pawar on Budget 2020) म्हणाले.
पिंपरी-चिंचवड : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (1 फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प सादर (Rohit Pawar on Budget 2020) केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी 16 सूत्रीय कार्यक्रम जाहीर केला. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देत भाजप सरकारवर अप्रत्यक्षरित्या टीका केली. “खरंच तो आकडा नक्की काय आहे? ते आधी बघावं लागेल. मी सकाळपासून कामात आहे. त्यामुळे तुम्ही जो आकडा सांगत आहात, तो बघावं लागेल. मी अजूनही पूर्ण बजेट बघितलेलं नाही. 15 लाख कोटी हा आकडा खरचं खोलात जाऊन बघावा लागेल,” असे रोहित पवार (Rohit Pawar on Budget 2020) म्हणाले.
“अर्थसंकल्पात जाहीर केलेला आकडा शेवटी तो काय आहे हे बघावं लागेल. कारण भाजप सरकारची खासियत आहे. चांगल्या पद्धतीने आकड्याबरोबर खेळायचं त्यांना माहित आहे. त्यामुळे तिथे फक्त दाखवण्यासाठी केलं आहे की, खरचं शेतकऱ्यांपर्यंत किंवा सर्वसामान्यांपर्यंत ती मदत जाईल याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल,” असे वक्तव्य रोहित पवार यांनी केलं.
“एकदा त्यांनी शेतकऱ्यांसाठी बजेट वाढवलं हे सांगितलं होतं. पण त्यांनी तसं केलं नव्हतं. त्यावेळी त्यांनी इंटरेस्टचा पोर्शन आधीचं काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार असताना इंटरेस्ट वेगळ्या बजेटमध्ये धरला जायचा. पण त्यावेळी त्यांनी सगळं क्लब केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी खूप बजेट आणलं असं भासवलं होतं. पण ते तसं नव्हतं. त्यांनी काही गोष्टी क्लब केल्या होत्या. या आकड्यामध्ये त्यांनी खरचं काय केलं आहे. ते थोडंस खोलात जाऊन बघावं लागेल,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी (Rohit Pawar on Budget 2020) दिली.
“आकडा न बघता मी शेतकऱ्यांसाठी खास इच्छा व्यक्त करतो की, शेतकऱ्यांसाठी खास त्यांच्या हातात जाईल, अशी मदत जाहीर केली असावी. ती लोकांना मिळाली असावी आणि जर योग्य पद्धतीने बजेटचे सादरीकरण केलं असेल. छोट्या शेतकऱ्यांसाठी जर ती मदत जाणार असेल तर माझ्यासारखा कार्यकर्ता त्याचं स्वागतचं करेल,” असेही रोहित पवार म्हणाले.
“एका वर्षात विकासाचा दर हा दहा टक्के पर्यंत जाईल असं वाटत नाही. कारण गेल्या पाच वर्षात घाई-घाईत घेतलेल्या निर्णयाचे परिणाम आता आपण भोगत आहोत, त्यात काही तज्ज्ञ जागतिक मंदी आहे असे म्हणतात. 2008 मध्ये सुद्धा भारतात जागतिक मंदी असताना आघाडी सरकारची जी वाढ होती ती 9 टक्क्याच्या आसपास होती. आज ते 6.5 पर्यंत घेऊन जाऊ असे म्हणतात. पण 5 आता आलं आहे. पण जर ते 5 टक्क्याच्या खाली आलं आणि 1 टक्का जरी विकासदर कमी झाला तर लाखो कोटींचा फटका देशाला पडेल,” असेही रोहित पवार म्हणाले.
मोदी सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. यात “शेती पंपांना सौर उर्जेवर जोडण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. या अंतर्गत 20 लाख शेतकऱ्यांना सौरउर्जा संयंत्र दिलं जाईल. जी राज्ये केंद्र सरकारच्या कायद्यांचं मॉडेल स्वीकारतील त्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. अन्नदाता उर्जादाता देखील आहे. पंतप्रधान कुसुम योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. पाण्याच्या प्रश्नाशी झुंज देत असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी व्यापक उपाय योजना केल्या जातील” यासारख्या अनेक योजना जाहीर करण्यात (Rohit Pawar on Budget 2020) आल्या.
नवी कररचना
जर तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला एक रुपयाही टॅक्स भरावा लागणार नाही. मात्र जर तुमचं उत्पन्न 5 लाखांच्या वर असेल, तर तुमचं करपात्र उत्पन्न हे अडीच लाखापासून मोजलं जाईल. म्हणजे अडीच ते 5 लाख रुपयांसाठी 5 टक्के, 5 ते 7 लाख 50 हजारांसाठी 10 टक्के याप्रमाणे कर आकारला जाईल.
कररचना – टॅक्स स्लॅबमध्ये बदल
- अडीच लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त
- उत्पन्न 2.5 ते 5 लाख – 5 टक्के कर (आधीही 5 टक्के)
- उत्पन्न 5 लाख ते 7.5 लाख – 10 टक्के कर (आधी 20 टक्के)
- उत्पन्न 7.5 लाख ते 10 लाख – 15 टक्के कर (आधी 20 टक्के)
- उत्पन्न 10 लाख ते 12.5 लाख – 20 टक्के कर (आधी 30 टक्के)
- उत्पन्न 12.5 ते 15 लाख – 25 टक्के कर (आधी 30 टक्के)
- उत्पन्न 15 लाखांपेक्षा अधिक – 30 टक्के कर (कोणतीही सवलत नाही)