Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी कोणते करावे शेअर खरेदी? Expert चा सल्ला काय

Share Market : जुलै महिन्याच्या अखेरीस देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी सरकारी कंपन्यांमध्ये गुंतवणुकीचे संकेत दिले होते. त्याचा गुंतवणूकदारांना फायदा झाला होता.

Budget 2024 : अर्थसंकल्पापूर्वी कोणते करावे शेअर खरेदी? Expert चा सल्ला काय
कोणते शेअर करणार मालामाल
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 4:11 PM

जुलै महिन्यात सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पावर सर्वांचेच लक्ष लागले आहे. मध्यमवर्ग हा कर सवलतीची आशा करत आहे. तर गरीब कुटुंबांच्या भल्यासाठी अजून योजनांची घोषणा होऊ शकते. तर शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना पण बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहे. एका अंदाजानुसार, सरकार काही क्षेत्रांना मोठा दिलासा देऊ शकते. त्यांच्यासाठी बुस्टर डोस, कर सवलती, आयात-निर्यातीसंबंधी काही सवलती देऊ शकते. त्यामुळे या सेक्टरमधील कंपन्यांना फायदा होईल आणि त्याचा थेट लाभ शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना होईल.

बाजाराविषयी अंदाज काय?

BTTV शी बोलताना सेंट्रम ब्रोकिंगचे सीईओ निश्चल माहेश्वरी यांनी काही शेअरबाबत अंदाज व्यक्त केला आहे. त्यांच्या मते बाजारातील अवमूल्यानाची भीती कमी झाली आहे. तर प्राईस टू अर्निंग (P/E) प्रमाणात कोणताही सुधारणा दिसत नाही. त्यामुळे 50 शेअर असणाऱा निफ्टी इंडेक्स वाढण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंत निफ्टी 24,000-24,500 अंकापर्यंत उसळी घेईल. सध्या निफ्टीने 24,000 अंकांचा टप्पा गाठला आहे.

हे सुद्धा वाचा

या शेअरबाबत तज्ज्ञ आश्वासक

माहेश्वरी यांनी सरकार यावेळी संरक्षणावर लक्ष केंद्रीत करेल, असा अंदाज वर्तवविला आहे. या सेक्टरमधील गुंतवणूक फायदेशीर ठरणार असल्याचे ते म्हणाले. 2-3 वर्षांच्या गुंतवणुकीसाठी हिंदुस्थान एअरोनॉटिक्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि सोलर इंडस्ट्रीजबाबत सकारात्मक दिसून आले. त्यांच्या मते सरकार अक्षय ऊर्जेवर अधिक लक्ष केंद्रीत करेल. आयात कमी करण्यावर भर देत आहे. सरकार येत्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करु शकते. MSP विषयी ठोस निर्णय होऊ शकतो.

रेल्वे आणि FMCG सेक्टरकडे लक्ष

सरकार रेल्वे आणि एफएमसीजी क्षेत्रावर लक्ष देऊ शकते. यामध्ये डाबर, इमामी आणि हिंदुस्थान युनिलिव्हर सारख्या कंपन्यांना फायदा होईल. पीएसयू सेक्टर पण सकारात्मक असेल. काही सार्वजनिक उपक्रमात गेल्या दोन वर्षांत 169 टक्क्यांपर्यंत उसळी दिसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यावेळी उन्हाळ्यात ब्लू स्टार सारख्या एसी उत्पादक कंपन्यांनी चांगली आघाडी घेतली. तर त्रिवेणी टर्बाईन, टेगा इंडस्ट्रीज सारख्या वीज उत्पादक कंपन्याच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.