Fact Check: बेरोजगार तरुणांना मोदी सरकार महिन्याला 3800 रुपये देणार?

कोरोनाच्या संकटात नोकऱ्या गमावलेल्या तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. | Berojgari Bhatta

Fact Check: बेरोजगार तरुणांना मोदी सरकार महिन्याला 3800 रुपये देणार?
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 8:47 PM

नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि व्हॉटसअ‍ॅपवर मोदी सरकारच्या नावाने एक मेसेज फिरत आहे. यामध्ये मोदी सरकार देशातील बेरोजगार तरुणांना (Unemployment) प्रत्येक महिन्याला 3800 रुपयांचा बेरोजगारी भत्ता (Berojgari Bhatta) देणार असल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकटात नोकऱ्या गमावलेल्या तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अनेकजण शक्य त्या माध्यमातून केंद्र सरकारच्या या योजनेची माहिती शोधायला लागले होते. मात्र, PIB Fact Check मध्ये हे वृत्त साफ खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. (Is Modi government announces rupees 3800 unemployment allowance?)

‘नोकरी’वरून सरकारची चहूबाजूंनी कोंडी; बजेटमध्ये मोठ्या घोषणेची शक्यता

येत्या 1 फेब्रुवारीला देशाचा बजेट सादर होणार असून, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या संकटामुळे सरकारसमोर बेरोजगारीची मोठी समस्या निर्माण झालीय. मोदी सरकारसाठी ते एक आव्हानच झालंय. त्यामुळे बजेटमुळे नोकरदारांना दिलासा दिला जाऊ शकतो. रोजगाराच्या मुद्द्यावर सरकारसमोर दुहेरी आव्हान आहे. कोरोनाच्या संकटात अनेकांचे नोकरीधंदे गेले आहेत. त्यामुळेच त्यांची सरकारच्या बजेटकडून बरीच आशा आहे.

ऑटो इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी

कोरोनाच्या संकटाची व्याप्ती कमी करण्यासाठी बजेटमध्ये सरकार अशा काही क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रित करू शकते, ज्यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. त्यात टेक्सटाईल, कन्स्ट्रक्शन, एमएसएमई आणि अफोर्डेबल हाऊसिंग या क्षेत्रांचा समावेश आहे. त्याशिवाय ऑटो इंडस्ट्रीजमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आहेत. सरकार या क्षेत्रासंबंधी बजेटमधून काही घोषणा करू शकते. हळूहळू ऑटो इंडस्ट्रीज कोरोना संकटातून बाहेर येण्यास यशस्वी ठरली आहे. जर बजेटमधून सरकारनं या क्षेत्राला पाठबळ दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतील.

तुम्हीही असा करा फॅक्टचेक

असा कुठलाही मेसेज आला तर तुम्ही याची अधिकृत माहिती मिळवू शकता. यासाठी https://factcheck.pib.gov.in/ या वेसबाईटवर किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर +918799711259 किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com वर फॅक्ट चेकसाठी पीआयबीला पाठवू शकता. ही माहिती पीआयबी वेबसाइट https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या:

Fact check | ‘पीएम निवृत्ती वेतन योजने’तून खरंच 70 हजार रुपये मिळणार?

Fact Check | तीन महिने रेशन न घेतल्यास तुमचं रेशन कार्ड रद्द होणार?

Fact Check : मोदी सरकार महिलांच्या खात्यात जमा करणार 60 हजार?

(Is Modi government announces rupees 3800 unemployment allowance?)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.