Currency : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवरुन हटविणार? केंद्र सरकारने संसदेत मांडले मत..

Currency : महात्मा गांधींच्या फोटोवरुन पुन्हा गदारोळ माजला आहे..

Currency : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा फोटो नोटेवरुन हटविणार? केंद्र सरकारने संसदेत मांडले मत..
गांधीजींचा फोटो हटविणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 14, 2022 | 5:56 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी भारतीय नोटांवर (Indian Currency) देवी लक्ष्मी आणि गणपती बप्पा यांचा फोटो छापण्याची मागणी केली होती. याप्रश्नी आता केंद्र सरकारने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात उत्तर दिले आहे. भारतीय नोटांवर स्वातंत्र्य सेनानी, मोठ्या व्यक्ती, देवी आणि देवता, पशू यांचे छायाचित्र छापण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात आली आहे. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचा फोटो भारतीय नोटांवरुन हटविण्यासंदर्भातील कोणती मागणी, प्रस्तावाला केंद्र सरकारने कडाडून विरोध केला आहे.

भारतीय नोटांवर देवी-देवतांचा फोटो छापण्याची मागणी फार जुनी आहे. लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या फोटोसाठी आग्रही मागणी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या मागणीसंदर्भात काय उत्तर दिले? केंद्र सरकारची काय योजना आहे? याविषयीची माहिती संसदेच्या हिवाळी अधिवेशनात देण्यात आली.

भारतीय नोटांवरील महात्मा गांधी यांचा फोटो हटवून त्याठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांचा फोटो लावण्याची मागणी करण्यात आली होती. अखिल भारत हिंदू महासभेने (Akhil Bharat Hindu Mahasabha) याविषयीची मागणी करुन नव्या वादाला तोंड फोडले होते.

हे सुद्धा वाचा

आरबीआय अॅक्ट 1934 च्या नियम 25 अंतर्गत केंद्रीय बँक आणि केंद्र सरकार मिळून नोट आणि त्यावरील छायाचित्राविषयीचा निर्णय घेते.छायाचित्र बदलवायचे असेल अथवा काढायचे असेल, नवीन फोटो लावायचा असेल तर याविषयीचा निर्णय केंद्रीय बँक अथवा केंद्र सरकार एकट्याने हा निर्णय घेत नाही. संयुक्तरित्या हा निर्णय घेते.

वास्तविक, नोटेवर कोणाचे छायाचित्र असावे हा निर्णय नियमाना धरुन न राहता राजनितीने अधिक प्रेरित असतो. यामध्ये केंद्र सरकार अधिक हस्तक्षेप करतो, हे स्पष्ट आहे.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे नाव नोटेवरुन हटविण्याची मागणी काही पहिल्यांदा झाली नाही. दस्तुरखुद्द मोदी सरकारनेच नोटेवरुन महात्मा गांधींचा फोटो हटविण्याची मागणी केली होती.

2016 मध्ये महात्मा गांधींचा फोटो हटवून त्याठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र लावण्याची मागणी करण्यात आली होती. पण नंतर केंद्र सरकारने यावर कुठलाच निर्णय घेतला नाही. जून 2022 मध्ये आरबीआयने महात्मा गांधीजींच्या फोटोसह डॉ. आंबेडकर आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा वॉटरमार्क लावण्याची गोष्ट केली. त्यांनी आयआयटी, दिल्लीला याविषयीचे डिझाईन तयार करायला सांगितले होते.

भारतीय नोटांवर 1966 पासून गांधींजा फोटो लावण्यात येत आहे. त्यापूर्वी नोटावर राष्ट्रीय प्रतिक अशोक स्तंभ, रॉयल बंगाल टायगर, आर्यभट्ट उपग्रह, शेती, शालीमार गार्डन यांचेही छायाचित्र छापण्यात आलेले आहेत.

1969 मध्ये महात्मा गांधी यांचा 100 वा जन्मदिवस होता. यादिवशी भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो वापरण्यात आला होता. या फोटोत महात्मा गांधी यांचे बसलेले छायाचित्र वापरण्यात आले होते. त्यांच्यामागे सेवाग्राम आश्रम होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.