नवी दिल्ली: सर्वाधिक लोकप्रिय क्रिप्टोकरन्सी म्हणून बिटकॉईन(Bitcoin) प्रसिद्ध आहे. गेल्या काही दिवसांपासून बिटकॉईनमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक झाली आहे. बिटकॉईनचं मूल्य वेगानं वाढलं आहे. मात्र, भारत सरकार बिटकॉईन ट्रेडिंग करणाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. बिटकॉईन ट्रेडिंग करणाऱ्यांवर 18 टक्के जीएसटी (GST) लावण्याच्या विचार करण्यात येत आहे. क्रिप्टोकरन्सीवर जीएसटी लावल्यास केंद्र सरकारला वर्षभरात 40 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. बिटकॉईनचं मूल्य वेगानं वाढत आहे. बिटकॉईनमधील गुंतवणूक 28 हजार 365 डॉलरवर पोहोचली आहे. तर एका बिटकॉईनची किंमत 20.90 लाख रुपये झाली आहे. (Modi Government thinking imposing 18 perennate GST on Bitcoin trade)
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, वित्त मंत्रालयांतर्गत काम करणाऱ्या सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्यूरोने(CEIB) ने सेंट्रल बोर्ड ऑफ इनडायरेक्ट टॅक्सेस अँड कस्टम (CBIC) ला बिटकॉईन संदर्भात सल्ला दिला आहे. CEIB ने बिटकॉईन ट्रेडिंगवर जीएसटी लावावा, असं सुचवले आहे. सेंट्रल इकॉनॉमिक इंटेलिजन्स ब्यूरोने क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंगवर जीएसटी लावण्यासंदर्भात अभ्यास केला आहे.
वित्त मंत्रालयाच्या सूंत्रांच्या नुसार, सीईआयबीने बिटकॉईनला इन्टेन्जबल अॅसेट क्लासमध्ये वर्गीकृतक करण्याती शिफारस केली आहे. यानुसार बिटकॉईनच्या ट्रेडिंगमधील व्यवहारांवर जीएसटी लावण्यात येईल. बिटकॉईन जगातील सर्वाधिक मोठं आभासी चलन आहे. या क्रिप्टोकरन्सीमध्ये 2017 मध्ये गुंतवणूक केलेल्यांना 845 टक्के परतावा मिळाला आहे. बिटकॉईनचा वापर करुन त्याला संबंधित देशातील चलनामध्ये परावर्तित करता येते.
बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करण्यास अमेरिकेतील वॉल स्ट्रीट ही कंपनी इच्छूक आहे. यामुळेही बिटकाईनचे मूल्य वाढले आहे. जगातील प्रसिद्ध कंपनी गुगेनहीम पार्टनर्सने 5.3 बिलीयन डॉलर मालमत्तेतील 10 टक्के रक्कम बिटकाईनमध्ये लावण्याचे जाहीर केले आहे. 2008 मध्ये जागतिक महामंदी सुरु असताना बिटकाईनची सुरुवात झाली होती.
कोरोना काळात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक वाढली
कोरोना काळामध्ये बिटकाईनने त्यांचे कमाईचे रेकॉर्डस मोडले आहेत. बिटकाईन ही ऑनलाईन स्वरुपातील क्रिप्टोकरन्सी आहे. कोरोना काळात बिटकॉईनमध्ये गुंतवणूक वाढली आहे. 2008 मध्ये सुरु झालेल्या बिटकॉईननं कोरोना विषाणूच्या संसर्गामध्ये मोठी झेप घेतली. इंटरनेटवर बिटकॉईन सारख्या अनेक क्रिप्टोकरन्सी आहेत. जगामध्ये सध्या 1500 क्रिप्टोकरन्सी अस्तित्वात आहेत. बिटकाईन एथरियम आणि लिब्रा यांच्यापेक्षा वेगानं वाढत आहे.
बिटकॉईनचे मूल्य का वाढलं?
कोरोना महामारीच्या काळात जागतिक अर्थव्यवस्था संकटात आल्या आहेत. ज्या क्षेत्रात कोणताही धोका नाही अशा ठिकाणी गुंतवणूक करण्याकडे नागरिकांचा कल आहे. सुरुवातीला लोकांनी सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. परिणामी सोन्याचे दर वाढले. त्यानंतर लोकांनी बिटकाईनला पसंती दिली कारण यामध्ये बँकांची कसलिही झंझट नसते. यावरील व्यवहार मुक्त आहेत. यामुळे गुंतवणुकीसाठी बिटकॉईनकडे लोकांचा कल वाढतोय. परिणामी बिटकॉईनच्या किमंती वाढत आहेत. मात्र, भारत सरकार बिटकॉईनवर जीएसटी लावणार आहे. त्यामुळे बिटकाईन व्यवहारांवर निश्चितच परिणाम होईल.
Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर https://t.co/t249jjoeNx #Petrol #Diesel #Mumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
संबंधित बातम्या:
सोन्याच्या दराचा शत्रू कोण? का घसरतोय सातत्यानं भाव?
क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करताय, कोरोना काळात ‘या’ कंपनीत गुंतवणुकीचे रेकॉर्ड मोडलेत
(Modi Government thinking imposing 18 percentage GST on Bitcoin trade)