Dividend : स्मॉल कॅप कंपनीची ऑफर छप्परफाड, लाभांशाची करणार लयलूट
Dividend : ही स्मॉल कॅप कंपनी गुंतवणूकदारांना जोरदार लाभांश देणार आहे..
नवी दिल्ली : अनेक कंपन्यांचे तिमाही निकाल (Quarterly Result) जाहीर करण्यात येत आहे. अनेक कंपन्यांना जोरदार फायदा झाल्याने कंपन्या नफ्याचे (Profit) वाटप करत आहेत. काही कंपन्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर (Bonus Share) देत आहेत. तर काही कंपन्या फेस व्हॅल्यूचे गिफ्ट देत आहेत. पण गुंतवणूकदारांचा सर्वात आवडती गोष्ट म्हणजे लाभांश (Dividend) देण्यावरही अनेक कंपन्यांचा जोर आहे.
मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया) लिमिटेड ही कंपनी पण गुंतवणूकदारांचा फायदा करण्यात मागे नाही. कंपनीने यंदा जोरदार कमाई केली आहे. त्याचा फायदा गुंतवणूकदारांना मिळणार आहे. कंपनीने प्रत्येक शेअर मागे 9 रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
मॉर्गनाइट क्रूसिबल (इंडिया) लिमिटेड कंपनीने लाभांश देण्याची रिकॉर्ड तारीखही घोषीत केली आहे. कंपनीने गेल्या वर्षीपेक्षा अधिकचा नफा कमावला आहे. या कंपनीचे एकूण भागभांडवल 553.85 कोटी रुपये आहे.
कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. गुरुवारी कंपनीच्या बोर्ड ऑफ डॉयरेक्टर्स ने 9 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. या लाभांश वाटपाचा आकडा थक्क करणारा आहे.
कंपनीने लाभांश वाटपाची तारीख घोषीत केली आहे. 23 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख जाहीर करण्यात आलेली आहे. एकूण 504 लाख रुपयांचे लाभांश पोटी वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठीची कंपनीने तयारी केलेली आहे.
ही कंपनी BSE वर सूचीबद्ध आहे. या कंपनीच्या शेअरची किंमत सध्या 953.30 रुपये आहे. शुक्रवारी हा शेअर 1.10 टक्के घसरुन 953 रुपयांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात हा शेअर 2.84 टक्के तर एका वर्षात 5.30 टक्के घसरला.
पण गेल्या पाच वर्षांचा विचार करता हा शेअर जवळपास 100 टक्के फायद्यात आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा नीच्चांकी स्तर 835 रुपये तर उच्चांकी स्तर 1220 रुपये होता. या शेअरचा फेस व्हॅल्यू 5 रुपये प्रति शेअर आहे.
चालू आर्थिक वर्षात या कंपनीने दुसऱ्या तिमाहीत एकूण 38.85 कोटी रुपयांची विक्री केली होती. तर गेल्या वर्षातील तिमाहीत 36.58 कोटी रुपयांची विक्री केली होती. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा या कंपनीला 6.20 टक्क्यांचा फायदा झाला आहे.