Dividend Stocks : अगदी बरोबर! 6 महिन्यात डबल रिटर्न, डिव्हडेंडही तगडा, रेल्वेच्या या स्टॉकची कमाल

Dividend Stocks : हा रेल्वे स्टॉक लवकरच मोठी कमाल करणार आहे. गुंतवणूकदारांची रक्कम सहा महिन्यातच डबल होईल. त्यांना लाभांशही मिळेल. गणित तर समजून घ्या.

Dividend Stocks : अगदी बरोबर! 6 महिन्यात डबल रिटर्न, डिव्हडेंडही तगडा, रेल्वेच्या या स्टॉकची कमाल
Follow us
| Updated on: Mar 25, 2023 | 12:03 PM

नवी दिल्ली : कंस्ट्रक्शन सेक्टरमधील सार्वजनिक उपक्रमातील कंपनी (PSU) रेल विकास निगम लिमिटेडने (Rail Vikas Nigam Ltd) गुंतवणूकदारांसाठी आर्थिक वर्ष 2023 साठी अंतरिम लाभांशाची (Dividend Stocks) घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाची शुक्रवारी, 24 मार्च रोजी बैठक झाली. त्यात शेअरधारकांना 17.7 टक्के प्रति इक्विटी शेअर, अंतरिम लाभांश देण्याचा निर्णय घेण्यात आला. रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) रेल्वे मंत्रालयातंर्गत काम करते. कंस्ट्रक्शन कंपनी म्हणून ती काम करते. RVNL गुंतवणूकदारांसाठी मल्टिबॅगर ठरली आहे. गेल्या 6 महिन्यात या शेअरने गुंतणूकदारांचा पैसा डबल केला आहे. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

केव्हा होते घोषणा

साधारणपणे कोणतीही कंपनी तिमाही निकालानंतर कॉर्पोट्सची, लाभाची घोषणा करतात. यामध्ये बोनस शेअर (Bonus Share), स्टॉक स्प्लिट (Stock Split) आणि लाभांशाचा (Dividend) समावेश असतो. लाभांशात कंपन्या अंतरिम लाभांश आणि खास लाभांशाची घोषणा करतात. त्यानुसार गुंतवणूकदारांना लाभ मिळतो. आरव्हीएनएलने अंतरिम लाभांशासाठी एक्‍स डेट, रिकॉर्ड डेट 6 एप्रिल 2023 ही आहे. तर लाभांशाची रक्कम 22 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यापूर्वी देण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

17.7 टक्क्यांचा लाभांश

रेल विकास निगम लिमिटेडने (Rail Vikas Nigam Ltd) आर्थिक वर्ष 2022-23 गुंतवणूकदारांना 1.77 रुपये प्रति इक्विटी शेअर अंतरिम लाभांश देण्याची घोषणा केली आहे. कंपनीचा स्टॉक फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे. त्यानुसार, गुंतवणूकदारांना 17.7 टक्क्यांचा अंतरिम लाभांश देण्यात येईल. रेल विकास निगम लिमिटेडने शेअर बाजाराला याविषयीची माहिती दिली आहे. अंतरिम लाभांशासाठी एक्‍स डेट, रिकॉर्ड डेट 6 एप्रिल 2023 ही आहे. तर लाभांशाची रक्कम 22 एप्रिल 2023 रोजी अथवा त्यापूर्वी देण्यात येईल.

RVNL स्टॉकने 6 डबल केली रक्कम

रेल विकास निगम लिमिटेडचा (RVNL) शेअर गुंतवणूकदारांना डबल फायदा मिळवून दिला. गेल्या 6 महिन्यात या शेअरने आतापर्यंत 93 टक्क्यांचा परतावा दिला. एका वर्षात या शेअर जवळपास 87 टक्के वधारला आहे. यावर्षात आतापर्यंत या शेअरचा 5 टक्के रिटर्न निगेटिव्ह आहे. हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा जवळपास 24 टक्के सवलतीवर व्यापार करत आहे. BSE वर 29 नोव्हेंबर 2022 रोजी हा शेअर 84.15 रुपये उच्चांकी होता. तर 26 जून 2022 रोजी हा शेअर त्याच्या 52 आठवड्यांच्या नीच्चांकावर, 29 रुपयांवर बंद झाला होता. 24 मार्च 2023 रोजी बीएसईवर RVNL चे मार्केट कॅप 13,579 कोटी रुपये होता.

हा कोणताही गुंतवणुकीचा सल्ला नाही. गुंतवणुकीसंबंधी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी अभ्यास आणि बाजारातील तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.