Expensive Toilet Paper : ऐकावे ते नवलच, जगातील सर्वात महागडा टॉयलेट पेपर, 1 रोलमध्ये येईल हेलिकॉप्टर!

Expensive Toilet Paper : जर तुम्हाला वाटत असेल की जगातील सर्वात महागडा टॉयलेट पेपर अगदी काही हजारात येत असेल तर हा तुमचा भ्रम आहे. या टॉयलेट पेपरच्या एका रोलमध्ये एक हेलिकॉप्टर येऊ शकते.

Expensive Toilet Paper : ऐकावे ते नवलच, जगातील सर्वात महागडा टॉयलेट पेपर, 1 रोलमध्ये येईल हेलिकॉप्टर!
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 9:50 PM

नवी दिल्ली : तुम्ही जगातील सोन्याच्या टॉयेलटविषयी (Gold Toilet) ऐकले असेल. दुबईतील अनेक श्रीमंतांच्या घरात, हॉटेलमध्ये सोन्याचे टॉयेलट आहेत. पण तुम्ही कधी सोन्याच्या टॉयलेट पेपरविषयी (Gold Toilet Paper) ऐकले आहे का? ऑस्ट्रेलियाची कंपनी टॉयलेट पेपर मॅन या कंपनीने ही कामगिरी केली आहे. कंपनीने 22 कॅरेट सोन्यापासून हा टॉयलेट पेपर तयार केला आहे. या 1 रोलच्या किंमतीत भारतातील एक छोटे हेलिकॉप्टर खरेदी करता येते. कंपनीने या सोन्याच्या टॉयलेट पेपरविषयी माहिती दिली आहे. कंपनीच्या संकेतस्थळावर याविषयीची माहिती दिली आहे. त्यानुसार, 22 कॅरेट सोन्याचा पेपर रोल विक्री झाला आहे. या महागड्या पेपर रोलचा सध्या कंपनीकडे स्टॉक नाही. जगात काही अचंबित करणाऱ्या गोष्टी घडतात. त्याची माहिती ही आपल्याला धक्का देऊ शकते. पण जगात अशा अनेक गोष्टी बातमीचा विषय ठरतात.

अर्थात कंपनीने सोन्याचा हा पेपर रोल कोणाला विक्री केला याची माहिती मात्र दिली नाही. कंपनीने या विक्रीचे सीक्रेट कायम ठेवले आहे. या 22 कॅरेट सोन्याच्या एका रोलची किंमत कंपनीने 10,75,45,750 रुपये होती. या टॉयलेट पेपर सोबत एक शॅम्पेनची बॉटल फ्री देण्यात आली. कंपनीच्या दाव्यानुसार, सोन्यापासून तयार करण्यात आलेला 3 प्‍लाईचा हा टॉयलेट पेपर खूप नरम आहे. याचा वापर झाल्यास, सोन्याचे कण खाली पडतात. तुम्हाला राजासारखा अनुभव येईल.

फ्लोरिडा स्माईल्स डॉट कॉमच्या अहवालानुसार, दुबईतील घरात, हॉटेलमध्ये सोन्याचे टॉयलेट पाहून कंपनीला सोन्याच्या टॉयलेट पेपरची कल्पना सुचली. जर टॉयलेट सोन्याचे असेल तर टॉयलेट पेपर सोन्याचा का नसावा, असा विचार करुन कंपनीने हा टॉयलेट पेपर तयार केला. टॉयलेट पेपर मॅन कंपनी टॉयलेट पेपर, हँड सॅनेटायझर, क्लिनिंग प्रोडक्ट आणि हंड ग्लोब्स सहित इतर अनेक वस्तूंची निर्मिती करते.

हे सुद्धा वाचा

हाँगकॉंगचा ज्वेलरी ब्रँड कोरोनेटने जगातील सोन्याचा टॉयलेट तयार केला होता. ही बातमी वणव्यासारखी जगभरात पसरली होती. या बातमीने जगात धुमाकूळ घातला होता. या टॉयलेट सर्वात अगोदर शांघाईच्या चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपोत सादर करण्यात आले होते. 2019 मध्ये सोन्याचा टॉयलेट सादर करण्यात आला होता.

या टॉयलेटच्या सीटमध्ये 40,815 हिरे जडलेले आहेत. हे हिरे 334.68 कॅरेटचे आहे. त्यावेळी कंपनीने या टॉयलेटची किंमत 9 कोटी 22 लाख रुपये ठेवली होती. काही दिवसांपूर्वी दुबईचे शाह अब्बदुल्लाह यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात सोन्याचा टॉयलेट आंदण म्हणून दिले होते.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.