Mother Day 2023 : सुपरमॉम! आई म्हणून ग्रेटच तर बिझिनेसमध्ये पण सुपरवुमन

Mother Day 2023 : मातृदिनी, भारतातील या आईंची ग्रेटभेट घेऊयात. त्या आई म्हणून ग्रेट तर आहेतच, पण उद्योजिका म्हणून ही त्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहेत..

Mother Day 2023 : सुपरमॉम! आई म्हणून ग्रेटच तर बिझिनेसमध्ये पण सुपरवुमन
Follow us
| Updated on: May 14, 2023 | 11:50 AM

नवी दिल्ली : मातृदिनी, (Mother Day Special) भारतातील या आईंची ग्रेटभेट घेऊयात. त्या आई म्हणून ग्रेट तर आहेतच, पण उद्योजिका म्हणून ही त्यांनी स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले आहेत. ही तारेवरची कसरत करतांना या आयांनी घराकडे अजिबात दुर्लक्ष होऊ दिले नाही. आईच्या हळवेपणा त्यांच्यात आहेच. पण व्यवसायासाठी लागणारी धडाडी, कौशल्य, जाहिरात, विपणनाचे कसब आणि व्यावसायिक हतोटी सर्व त्यांच्या अंगी आहे. विशेष म्हणजे यांना व्यवसायाचा फार मोठा वारसा लाभला नाही. काहींनी तर नव्याने व्यवसाय उभारला आहे. कोण आहेत या सुपरमॉम (SuperMom)..

Dipali Mathur Dayal : दिपाली सुपर स्मैली या कंपनीच्या सह-संस्थापक आहेत. ही एक पर्सनल केअर उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात 2018 साली करण्यात आली होती. दिपाली कंपनीचे प्रोडक्ट व्हिझन, ब्रँड मॅनेजमेंट, स्ट्रॅटर्जी आणि इतर ऑपरेशनल कामे सांभाळतात. या कंपनीच्या दाव्यानुसार, त्यांचे उत्पादन पूर्णतः नैसर्गिक घटकांनी तयार होते. त्यात विषारी घटकांचा वापर होत नाही. त्यांना एक मुलगी आहे.

हे सुद्धा वाचा

Ghazal Alagh

Ghazal Alagh : गजल अलघ यांना अनेकांनी लोकप्रिय टीव्ही शो शार्क टँक इंडियामध्ये पाहिले असेल. लहान मुलांसाठी उत्पादनं तयार करणाऱ्या मामाअर्थ या कंपनीच्या सहसंस्थापक आहेत. ही कंपनी युरोपियन उत्पादन दर्जानसुार, त्यांचे उत्पादन तयार करते. ही कंपनी 3000 प्रकारच्या विषारी घटकांचा कुठलाही वापर न करता उत्पादन करत असल्याने प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यांना एक मुलगा आहे.

Dr. Rupali Ambegaonkar

Dr. Rupali Ambegaonkar : डॉ. रुपाली अंबेगावकर यांनी 2010 साली एक चहा कंपनीची सुरुवात केली होती. या कंपनीचे नाव कल्चर ऑफ द वर्ल्ड असे आहे. चहाची खास पानं आणि स्वाद यासाठी ही कंपनी प्रसिद्ध आहे. ही कंपनी भारताच्या चहा जगभरात पोहचवत आहे. पूर्ण दिवस व्यवसायात गुंतलेले असतानाही त्या मुलांसाठी वेळ काढतात. त्यांच्यासाठी खास सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जातात.

Nidhi Batra

Nidhi Batra : निधी या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांनी 2013 साली एक ट्रॅव्हल कंपनी निर्वाना एक्सकर्जनची सुरुवात केली होती. ही कंपनी ग्राहकांसाठी कास टूर काढते. त्यांना विविध स्कीमअंतर्गत टूरवर नेते. पर्यटन स्थळापासून धार्मिक स्थळांची यात्रांचा यामध्ये समावेश आहे. कामाचा किती बोजा असला, त्यात कामात गर्ग असल्या तरी मुलांसाठी वेळ काढतात

Meenal Arora

Meenal Arora : शिक्षक आणि शिक्षणतज्ज्ञांना या प्रशिक्षण देतात. त्या एका शाळेच्या संस्थापक आहेत. यासोबतच त्या प्रशिक्षण आणि विकास विभागाची जबाबदारी सांभाळतात. त्यांनी पालकांसाठी खास पुस्तक पण लिहिलेले आहे. त्यांना महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाने पुरस्कार दिला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.