Gold Silver Record : खुशखबर! चांदी घसरली, सोन्याची दुडूदुडू धाव

Gold Silver Record : आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या भावात मामूली वाढ झाली तर चांदीने दोन पाऊल मागे घेतले आहे. पण हे मौल्यवान धातू विक्रमाच्या दिशेने आगेकूच करत आहेत.

Gold Silver Record : खुशखबर! चांदी घसरली, सोन्याची दुडूदुडू धाव
वाढता वाढता वाढे
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 9:11 AM

नवी दिल्ली : सोने-चांदीने (Gold Silver Price) नवीन विक्रमाच्या दिशेने आगेकूच सुरु केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या धातूंमध्ये विक्रम तोडण्याची कोण स्पर्धा लागली आहे. पंधरा दिवसानंतर सोने-चांदीत कमालीची उसळी येत आहे. खरेदीदारांच्या डोक्याला त्यामुळे ताप झाला आहे. सहा महिन्यातच किंमतींनी मोठा पल्ला गाठल्याने गुंतवणूकदारांचा फायदा झाला असला तरी सर्वसामान्य खरेदीदारांनी सराफा बाजाराकडे पाठ फिरवली आहे. शुक्रवारी संध्याकाळी बाजारात सोने-चांदीने नवीन रेकॉर्डकडे धाव घेतली. सोमवारपर्यं मौल्यवान धातू अजून एक विक्रम नावावर करण्याच्या तयारीत आहे. सोने 65,000 तर चांदी 82,000 होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आजचा भाव काय गुडरिटर्न्सनुसार, आज सोन्याच्या किंमतीत किंचित वाढ झाली. 15 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपये प्रति तोळा वाढला. आज हा भाव 56,810 रुपये प्रति तोळा आहे. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्यात 10 रुपयांची वाढ होऊन किंमती 61,960 रुपयांवर पोहचल्या. चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली. चांदी शुक्रवारी संध्याकाळी 79,600 रुपये किलो होती. यामध्ये 1100 रुपयांची घसरण होऊन भाव 78,500 रुपये किलो झाला.

सोने सत्तरी गाठणार सोने-चांदीने 5 एप्रिल रोजी रेकॉर्ड केला होता. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,400 रुपये तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याची किंमत 61,510 रुपये होती. सोन्याला 70,000 टप्पा गाठायला आता फार वेळ लागणार नाही. तर चांदीने आज यु-टर्न घेतला असला तरी चांदी लवकरच 80,000 चा टप्पा गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

चार शहरातील भाव गुडरिटर्न्सनुसार, मुंबईत 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,660 रुपये होती. तर 24 कॅरेट एक तोळा सोन्याचा भाव 61,830 रुपये होता. पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,660 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,830 रुपये आहे. नागपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,660 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,830 रुपये आहे. नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या भाव 56,690 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 61,860 रुपये आहे.

भाव एका मिस्ड कॉलवर 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

शुद्ध सोन्याचा हॉलमार्क भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916 तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात.

काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.