ईशा अंबानी यांच्या या भावाने वडिलांचे अपयश काढले धुवून, 2000 कोटींचे उभारले साम्राज्य

Anil Ambani | धीरुभाई अंबानी यांच्यानंतरच्या पिढीत मुकेश आणि अनिल अंबानी यांनी मोठा पसारा वाढवला. नंतर मात्र अनिल अंबानी यांचे निर्णय चुकले. व्यवसायाला घरघर लागली. मुकेश अंबानी यांच्या तीनही मुलांनी कमाल कामगिरी केली. आता त्यांच्या या भावाने पण नावाला साजेशी कामगिरी करुन दाखवली.

ईशा अंबानी यांच्या या भावाने वडिलांचे अपयश काढले धुवून, 2000 कोटींचे उभारले साम्राज्य
Follow us
| Updated on: Mar 17, 2024 | 11:02 AM

नवी दिल्ली | 17 March 2024 : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा भाऊ अनिल अंबानी देशातील मोठ्या उद्योगपतींमध्ये गणले जातात. रिलायन्सच्या वाटणीत त्यांच्याकडे अनेक दिग्गज कंपन्या आल्या होत्या. या कंपन्यांनी सुरुवातीला चांगली घौडदौड केली. पण नशीबाचे काटे पलटले. अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील कंपन्या तोट्यात गेल्या. तर मुकेश अंबानी यांचे नाणे वाजले. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने अनेक उद्योगात मोठी झेप घेतली. आता या दोन्ही भावांची मुलं ही उद्योगाच्या साम्राज्यात उतरली आहे. मुकेश अंबानी यांची दोन मुलं आणि मुलीला तर सर्व जग ओळखते. पण अनिल अंबानी यांचा मुलगा लाईमलाईटपासून दूर आहे. वडिलांकडून झालेल्या चुका दूर करत त्याने अपयशाचा कलंक पुसला आहे. या तरुणाने त्यांच्या मेहनतीच्या जोरावर 2000 कोटींचे साम्राज्य उभं केले.

आजोबांसह वडिलांचे स्वप्न करणार पूर्ण

व्यवसाय उभारायला फार काळ लोटतो. पण व्यवसाय बंद व्हायला एक दिवस ही पुरेसा असतो. अनिल अंबानी यांनी हा अनुभव घेतला आहे. त्यांच्या चुकांमुळे हात पोळले आहे. आता त्यांची मुलं जय अनमोल वडिलांवरील बसलेला अपयशाचा शिक्का पुसण्यासाठी झटत आहेत. ते वडिलांसाठी आशेचे किरण ठरले आहेत. अंबानी कुटुंबात जन्म झाल्याने जय अनमोलवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्याला आजोबा धीरुभाई अंबानी आणि वडील अनिल अंबानी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे.

हे सुद्धा वाचा

प्रशिक्षणार्थी म्हणून केले काम

जय अनमोल याने त्याच्या करिअरची सुरुवात रिलायन्स म्युच्युअल फंडामध्ये (Reliance Mutual Fund) वयाच्या 18 व्या वर्षी एक प्रशिक्षणार्थी म्हणून केली. 2014 मध्ये ते या कंपनीशी जोडल्या गेले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर ते रिलायन्स निपॉन एसेट मॅनेजमेंट आणि रिलायन्स होम फायनान्समध्ये बोर्ड मेंबर झाले. अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (Anil Dhirubhai Ambani Group) या काळात कर्जाच्या ओझ्याखाली दबला. त्यानंतर या उद्योगाची कमान जय अनमोलने संभाळली. त्यांनी जपानी कंपनी निपॉनची रिलायन्समधील गुंतवणूक वाढवली. त्यांनी रिलायन्स लाईफ इन्शुरन्स आणि रिलायन्स कॅपिटल एसेट मॅनेजमेंट कंपन्या स्थापन केल्या.

प्रसिद्धीपासून चार हात लांब

जय अनमोलच्या मेहनतीने रंग दाखवला. त्यामुळे रिलायन्सची नेटवर्थ 2000 कोटी रुपयांच्या घरात पोहचली. वर्ष 2022 मध्ये जय अनमोलने कृशा शाह सोबत लग्न केले. त्याच्या काकाची मुलं अनंत, आकाश आणि इशा कायम चर्चेत असतात. पण जय अनमोल याला त्यासाठी वेळ नाही. जय अनमोलला अपयश धुवून काढण्यासाठी मोठी मेहनत करावी लागत आहे. वडिलांच्या कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी तो कष्ट घेत आहे.

Non Stop LIVE Update
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.