Mukesh Ambani Birthday : वडिलांच्या मृत्यूनंतर उभं केलं मोठं साम्राज्य; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे बनले ?

Happy 67th Birthday Mukesh Ambani : रिलायन्सचे अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा जन्म भारतात नाही तर येमेनमध्ये झाला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीज नवीन उंची गाठत आहे आणि देशातील सर्वात मौल्यवान कंपनी ठरली आहे.

Mukesh Ambani Birthday : वडिलांच्या मृत्यूनंतर उभं केलं मोठं साम्राज्य; मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कसे बनले ?
मुकेश अंबानी यांचा आज वाढदिवस
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 10:07 AM

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा आज (19 एप्रिल) वाढदिवस आहे. 19 एप्रिल 1957 रोजी जन्मलेले मुकेश अंबानी हे आता 67 वर्षांचे झाले आहेत. केवळ भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश यांचा जन्म भारताबाहेर येमेनमध्ये झाला असला तरी आपल्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी देशात व्यवसायाचे साम्राज्य उभे केले जे जगभरात प्रसिद्ध आहे. मुकेश अंबानी हे जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत 11व्या क्रमांकावर आहेत.

आज, Reliacne चा व्यवसाय रिटेल आणि फायनान्ससह विविध क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे आणि मार्केट कॅपच्या बाबतीत, मोठ्या कंपन्या मागे पडल्या आहेत. मुकेश अंबानी यांनी शिक्षण सोडून वडिलांच्या व्यवसायात प्रवेश केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर रिलायन्सची सूत्रे हाती घेत कंपनीचा कारभार समर्थपणे सांभाळून तिला नव्या उंचीवर नेले. आज Reliance Market Cap 19.79 लाख कोटी रुपये आहे आणि त्याने 20 लाख कोटी रुपयांचा आकडाही ओलांडला आहे. ज्या वेगाने कंपनीचा विस्तार झाला, त्यानंतर मुकेश अंबानी यांनी संपत्ती आणि समृद्धीच्या बाबतीत सर्वांना मागे टाकले आहे.

आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार (Bloomberg Billionaires Index), 112 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह, मुकेश अंबानी हे जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानींचा या पदापर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच रंजक आहे. त्यांचे वडील दिवंगत धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज जिथे सोडली होती, मुकशे अंबानी यांनी तेथून ती कंपनी अशी पातळीवर नेली की देश आणि जगातील मोठ्या कंपन्या खूप मागे पडल्या.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत प्रवेश, मात्र मध्येच शिक्षण का सोडलं ?

रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. यानंतर त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेशही घेतला, पण अभ्यास अर्धवट सोडून वडिलांना व्यवसायात मदत करू लागले. मुकेश अंबानी यांनी 1981 मध्ये वडील धीरूभाई अंबानी यांच्यासोबत रिलायन्स ग्रुपमध्ये प्रवेश केला होता. यानंतर, 1985 मध्ये कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड वरून बदलून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड असे करण्यात आले. आपल्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून चालत असलेले मुकेश अंबानी पेट्रोलियमशिवाय दूरसंचार क्षेत्रातही पुढे गेले आणि त्यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची स्थापना केली.

धीरूभाईंचे निधन आणि कुटुंबात फूट

रिलायन्सचा पाया रचणाऱ्या धीरूभाई अंबानी यांचे 6 जुलै 2002 रोजी निधन झाले. त्यानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची जबाबदारी स्वीकारली. मात्र, वडिलांचे निधन होताच अंबानी कुटुंबात फूट पडू लागली. नुकेश अंबानी आणि त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू झाला आणि हा वाद वाटणीपर्यंत पोहोचला. अंबानी कुटुंबातील विभाजनाचा भाग म्हणून, रिलायन्स इन्फोकॉम ही कंपनी धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्याकडे गेली, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुकेश अंबानी यांच्याकडे आली.

विभाजनानंतर, अनिल अंबानींना रिलायन्स समूहाचे बहुतेक नवीन व्यवसाय मिळाले, तर मुकेश अंबानींना जुन्या व्यवसायावर समाधान मानावे लागले. पण एकीकडे अनिल अंबानींच्या घाईमुळे त्यांच्या कंपन्या कर्जाच्या ओझ्याखाली आल्या आणि डबघाईला येऊ लागल्या. तर दुसरीकडे मुकेश अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा ताबा घेतला आणि पुढे नेत राहिले. 2002 मध्ये जेव्हा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा पदभार स्वीकारला, त्यावेळी त्याचे मार्केट कॅपिटलायजेशन फक्त 75,000 कोटी रुपये होते. मात्र मुकेश अंबानी यांनी आपल्या कठोर मेहनतीने आणि समर्पणाने रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनवली आणि तिचे बाजारमूल्य 20 लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

कुठे विस्तारला आहे मुकेश अंबानींचा बिझनेस ?

रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी केवळ पेट्रोलियमच नव्हे तर रिटेल, लाइफ सायन्सेस, लॉजिस्टिक, टेलिकॉम आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातही जोरदार एंट्री केली. त्यांची रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी रिटेल बिझनेस कंपनी आहे आणि तिचा पोर्टफोलिओ सतत विस्तारत आहे. याशिवाय अंबानींनी 2016 मध्ये लॉन्च केलेली रिलायन्स जिओ या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली.

Jio ची कमाल, रिलायन्स कर्जमुक्त

रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या शहाणपणामुळे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL LTD) ने अवघ्या 58 दिवसांत Jio प्लॅटफॉर्मचा चौथ्या भागापेक्षा कमी भाग विकून 1.15 लाख कोटी रुपये आणि राईट इश्यूद्वारे 52,124.20 कोटी रुपये उभे केले. यामुळे कंपनी नियोजित वेळेच्या नऊ महिने आधीच पूर्णपणे कर्जमुक्त झाली. 31 मार्च 2020 अखेर रिलायन्सवर 1,61,035 कोटी रुपयांचे कर्ज होते आणि कंपनीने 31 मार्च 2021 पर्यंत त्याची परतफेड करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मुकेश अंबानींनी कंपनीला नऊ महिन्यांपूर्वीच कर्जमुक्त केले आणि यामध्ये जिओने महत्त्वाची भूमिका बजावली. आता त्यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने फायनान्स क्षेत्रातही धमाल केली आहे.

रिलायन्स ग्रुपचा झपाट्याने विस्तार होत असून आता मुकेश अंबानी यांनी हा प्रचंड व्यवसाय त्यांच्या तीन मुलांमध्ये विभागला आहे. त्यांची तीनही मुले व्यवसायाचा विस्तार करत आहेत. मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी याने रिलायन्स जिओची जबाबदारी घेतली आहे, तर मुलगी ईशा अंबानी रिलायन्स रिटेलला नवीन उंचीवर नेण्यासाठी एकामागून एक डील करतआहे. अंबानी कुटुंबाचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे जुलैमध्ये लग्न आहे. अनंत याच्याकडे रिलायन्स समूहाच्या नव्या एनर्जी बिझनेसची जबाबदारी आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.