Mukesh Ambani Dance : मुकेश अंबानी यांनी सलमान खान याच्या या गाण्यावर धरला ताल, डांस पाहून म्हणाल, भाई वाह..

Mukesh Ambani Dance : मुकेश अंबानी यांनी सलमान खानच्या गाण्यावर असा ताल धरला आहे, हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे.

Mukesh Ambani Dance : मुकेश अंबानी यांनी सलमान खान याच्या या गाण्यावर धरला ताल, डांस पाहून म्हणाल, भाई वाह..
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 8:03 PM

नवी दिल्ली : देशातील अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा एक डांस सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. मुलाच्या साखरपुड्यात कुटुंबियांसोबत अंबानी यांनी सलमान खान याच्या गाण्यावर (Salman Khan Song) ताल धरला. सलमान खान याच्या ‘हम आपके हैं कौन’ या गाण्यावर थिरकले. कुटुंबियांसोबत या दिग्गज उद्योगपतीने आनंद साजरा केला. मुलाच्या लग्नात त्यांनी गाण्यावर डान्स (Dance) करुन आनंद साजरा केला. अर्थात हा डान्स पाहून अनेकांनी भाई वाह, काय डान्स केला, अशा प्रतिक्रिया दिल्या.

मुकेश अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुड्याचा हा व्हिडिओ आहे. मुकेश अंबानी यांच्या सोबत त्यांची पत्नी नीता अंबानी, मुलगी ईशा अंबानी, तिचा पती आनंद पिरामल, मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका मेहता एकत्र आल्याचे व्हिडिओत दिसते.

हे सुद्धा वाचा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखरपुडा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या आलिशान निवासस्थानी झाला. या कार्यक्रमात अनेक दिग्गजांनी आणि प्रसिद्ध लोकांनी हजेरी लावली. राधिका मर्चेंट अनंत अंबानी यांची लहानपणीची मैत्रिण आहे.

देशातील प्रमुख औषध निर्माता कंपनी एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आणि अब्जाधीश उद्योगपती वीरेन मर्चेंट यांची ती मुलगी आहे. तिच्या आईचे नाव शैला मर्चेंट आहे. राधिकाचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला. तिला भारतीय शास्त्रीय नृत्यात रुची आहे. तिने आठ वर्षांपर्यंत भरतनाट्यमचे धडे गिरवले आहे.

गेल्यावर्षी मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी होणाऱ्या सूनेसाठी अरंगेत्रम चे आयोजन केले होते. या कार्यक्रमालाही अनेक मोठ्या व्यक्तींनी उपस्थिती लावली होती. सेलेब्रिटी आणि मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

राधिका हिने न्यूयॉर्क विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. तर अनंतने अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आहे. राधिकाला पुस्तक वाचण्याची आवड आहे. पोहणे, नृत्य ही तिची आवड आहे. राधिका ही स्टाईलिश आहे. सध्या ती कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे.

2018 साली या दोघांचे फोटो व्हायरल झाले होते. तेव्हापासून दोघांचे नाव समोर आले. राधिकाच्या आईचे नाव शैला मर्चेंट आहे. राधिका ही एकुलती एक मुलगी आहे. मीडिया रिपोर्टनुसार राधिकाची एकूण संपत्ती 8-10 कोटी रुपयांच्या जवळपास आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.