Mukesh Ambani : आता मुकेश अंबानी यांचा क्रमांक! श्रीमंतांच्या टॉप-10 मधून बाहेर फेकले जाणार
Mukesh Ambani : सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 81.7 अब्ज डॉलर इतकी आहे. पण हे वर्ष अदानींप्रमाणेच त्यांना ही लकी ठरलं नाही. दोन महिन्यांतच त्यांच्या संपत्तीत जवळपास 5.38 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली.
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारताच्या धनकुबेरांवर लक्ष्मी रुसली आहे. त्यांच्या संपत्तीत सातत्याने घट होत आहे. झपाट्याने संपत्तीत घसरण होणाऱ्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत सर्वात वरती गौतम अदानी (Gautam Adani) , त्यानंतर मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि तिसऱ्या क्रमांकावर राधाकिशन दमानी यांचा क्रमांक आहे. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 81.7 अब्ज डॉलर इतकी आहे. पण हे वर्ष अदानींप्रमाणेच त्यांना ही लकी ठरलं नाही. दोन महिन्यांतच त्यांच्या संपत्तीत जवळपास 5.38 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली. ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्सवर (Bloomberg Billionaires Index) सध्या नजर टाकली असता या सूचीनुसार, जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीत केवळ एकच भारतीय आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सध्या या यादीत 10 व्या स्थानी आहेत. पण तेही लवकरच या यादीतून बाहेर फेकल्या जातील, असे सांगण्यात येत आहे.
ब्लूमबर्गच्या यादीत मुकेश अंबानी यांच्या जागी लवकरच Sergey Brin यांचा क्रमांक लागू शकतो. सध्या मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 81.7 अब्ज डॉलर इतकी आहे. पण हे वर्ष अदानींप्रमाणेच त्यांना ही लकी ठरलं नाही. दोन महिन्यांतच त्यांच्या संपत्तीत जवळपास 5.38 अब्ज डॉलरची घसरण दिसून आली. त्यांच्यानंतर ब्रिन आहेत. त्यांची सध्याची संपत्ती 80.7 अब्ज डॉलर आहे.त्यांच्या संपत्तीत दोन महिन्यात एकूण 1.31 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. ते लवकरच अंबानी यांची जागा घेऊ शकतात.
या यादीत गौतम अदानी यांची घसरण थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. ब्लूमबर्गच्या श्रीमंतांच्या यादीता ते काही महिन्यांपूर्वी दुसऱ्या स्थानी होते. त्यानंतर हिंडनबर्ग अहवाला आला आणि होत्याचे नव्हते झाले. त्यांच्या साम्राजाला भगदाड पडले. त्यांचे शेअर धडाधड पडले. अजूनही त्यांना म्हणावा तसा दिलासा मिळालेला नाही. सध्या अदानी हे ब्लूमबर्ग बिलिनेयर्स इंडेक्समध्ये 30 व्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यांच्या संपत्तीत दोन महिन्यात 80.6 अब्ज डॉलरची घसरण आली आहे.
अदानी यांच्या संपत्तीत तर मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या समूहाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या समूहाला 11 लाख कोटींचा फटका बसला आहे. अमेरिकन रिसर्च फर्म हिंडनबर्ग रिसर्चच्या अहवाल अदानी यांच्या समूहावर भारी पडला आहे. 24 जानेवारीपासून सुरु झालेले हे वादळ अजूनही शमलेले नाही. त्यात समूहाची एकूण संपत्ती 12 लाख कोटी रुपयांनी कमी झाली आहे.
24 जानेवारीपासून अदानी समूहासाठी एकच बाब दिलासादायक ठरली आहे, ती म्हणजे भारतीय रेटिंग एजन्सीजीने अद्याप या कंपन्यांचे मानांकन कमी केलेल नाही. त्यामध्ये कोणताही बदल केलेला नाही. 25 जानेवारी ते 21 फेब्रुवारी यांच्या दरम्यान अदानी समूहाच्या 10 सुचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये 21.7 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत घसरण आली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारही या शेअर्सपासून एकतर दूर राहत आहेत. त्यांनी सावध भूमिका घेतली आहे.