Mukesh Ambani : सलग चौथ्या वर्षी नाही घेतला एकही छदाम; भावांना महिन्याकाठी इतका पगार

Mukesh Ambani Salary : मुकेश अंबानी त्यांच्या वेतन न घेण्याच्या निर्णयाने पुन्हा चर्चेत आले आहे. त्यांनी सलग चौथ्या वर्षी वेतनात एक छदाम सुद्धा घेतला नाही. पगार न घेता ते रिलायन्स समूहात काम करत आहेत. ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

Mukesh Ambani : सलग चौथ्या वर्षी नाही घेतला एकही छदाम; भावांना महिन्याकाठी इतका पगार
सलग चौथ्या वर्षी नाही घेतले वेतन
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 9:12 AM

सलग चौथ्या वर्षी कोणताही पगार न घेता काम करण्याचा रेकॉर्ड रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या नावावर नोंदवल्या गेला. त्यांनी कोरोना काळापासून कंपनीकडून कोणतेही वेतन घेतले नाही. पेट्रोलियम ते टेलिकॉमपर्यंत अनेक क्षेत्रात रिलायन्स समूहाचे साम्राज्य पसरले आहे. मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स देशातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे. अंबानी यांच्या मुलांना कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकींना हजर राहण्यासाठी सिटिंग फी आणि कमिशन देण्यात येते. सिटिंग फी ही कंपनीच्या संचालक मंडळाच्या स्वतंत्र सदस्यांना बैठकीसाठी देण्यात येते.

का घेतला पगार न घेण्याचा निर्णय

मुकेश अंबानी (67) यांनी आर्थिक वर्ष 2008-09 ते 2019-2020 या दरम्यान त्यांचे वेतन 15 कोटी रुपये असे मर्यादीत ठेवले होते. त्यात त्यांनी कधीच वाढ होऊ दिली नाही. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कोविड-19 महामारी आली. त्यामुळे त्यांनी या काळात त्यांचे वेतन न घेण्याचा निर्णय जाहीर केला. जोपर्यंत कंपनी आणि इतर व्यवसाय पुन्हा पूर्णपणे कमाई करत नाही, तोपर्यंत आपण वेतन घेणार नाही, असे त्यांनी घोषणा केली. त्या निर्णयावर ते आजही ठाम आहेत. कंपनीच्या वार्षिक अहवालात त्यांचा हा दृढ निश्चिय पुन्हा दिसला. या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2023-24 साठी त्यांनी वेतन, भत्ते, अनुषांगिक लाभ, सेवानिवृत्तीचा लाभ हे सर्व शून्यावर आणले आहे. म्हणजे ते कामाच्या मोबदल्यात कंपनीकडून एक छदाम पण घेणार नाहीत.

हे सुद्धा वाचा

1977 मध्ये रिलायन्स संचालक मंडळात

मुकेश अंबानी हे 1977 मध्ये रिलायन्स समूहाच्या संचालक मंडळात दाखल झाले. जुलै, 2002 मध्ये धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर ते समूहाचे संचालक झाले. गेल्यावर्षीच त्यांची रिलायन्सच्या प्रमुखपदी नियुक्ती 2029 पर्यंत वाढवण्यात आली. त्यांची फेरनियुक्ती करण्यात आली. या कालावधीत त्यांनी अजून एक पैसा सुद्धा पगार घेतला नाही. अंबानी यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डॉलर इतकी आहे. तर ते जगातील 11 वे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

भावांचा पगार किती?

अंबानी यांचे मावस भाऊ व इतर नातेवाईकांना चांगला पगार आहे. निखिल आणि हितल मेसवानी यांचा आर्थिक वर्ष 2023-24 साठी क्रमशः 25:31 कोटी आणि 25:42 कोटी रुपये पगार मिळाला. दोघांचे वेतन आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 25-25 कोटी रुपये होते. यामध्ये 17.28 कोटी रुपयांचे कमिशनचा समावेश आहे. कार्यकारी संचालक पी एम एस प्रसाद यांच्या वेतनात वाढ होऊन ते आता 17.93 कोटी रुपये झाले. तर नीता अंबानी या गैर कार्यकारी संचालक आहेत. त्यांना संचालक मंडळाच्या बैठकांना हजेरी लावली म्हणून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 97 लाख रुपयांचे कमिशन मिळाले.

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.