Mukesh Ambani : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांना दे धक्का! मार्क झुकरबर्गची कुरघोडी

Mukesh Ambani : ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या टॉप-10 अब्जाधीशांनी गुरुवारी जवळपास 25 अब्ज डॉलरची कमाई केली. पण या यादीत पुन्हा उलटफेर झाला.

Mukesh Ambani : श्रीमंतांच्या यादीत मुकेश अंबानी यांना दे धक्का! मार्क झुकरबर्गची कुरघोडी
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 6:40 PM

नवी दिल्ली : श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर झाला. ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) टॉप-10 अब्जाधीशांनी गुरुवारी जवळपास 25 अब्ज डॉलरची कमाई केली. पण या यादीत दिग्गजांना धक्का बसला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे खेचत फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) आगेकूच केली. गुरुवारी अमेरिकन शेअर बाजारात तेजी होता. फेसबुकचे तिमाही निकालामुळे अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी वाढ दिसून आली. मेटाचा शेअर जवळपास 14 टक्क्यांनी उसळून बंद झाला. त्याचा परिणाम मार्क झुकरबर्गच्या संपत्तीवर दिसून आला. एकाच दिवसात त्याच्या संपत्तीत मोठी वाढ झाली, तर मुकेश अंबानी यांना झुकरबर्गने मागे ढकलले.

असा झाला बदल ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्समध्ये फेरबदल झाला. मुकेश अंबानी हे 12 व्या क्रमांकावरुन थेट 13 व्या क्रमांकावर फेकले गेले. फेसबुकचे सीईओ झुकरबर्ग यांची संपत्ती एकाच दिवसात 10.2 अब्ज डॉलरने वाढून 87.3 अब्ज डॉलरवर पोहचली. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती आता 82.4 अब्ज डॉलर आहे. मेटाच्या शेअरमध्ये आलेल्या तुफान तेजीमुळे अंबानी यांना मागे टाकून झुकरबर्ग यांनी आगेकूच केली. तर यादीत अमेरिकन अब्जाधीशांचा दबदबा आहे.

शेअर बाजारात तेजीचे सत्र अमेरिकन शेअर बाजार डाऊ जोन्स 1.57 टक्के म्हणजे 524 अंकांनी उसळला. हा निर्देशांक 33.826 स्तरावर बंद झाला. तर एसअँडपी 500 निर्देशांकात 1.96 टक्के म्हणजे 79 अंकांची वाढ झाली. नॅस्डॅकमध्ये सर्वाधिक वाढ झाली. ही वाढ 2.43 टक्के होती. नॅस्डॅक 287 अंकांनी वाढून 12,142 अंकावर बंद झाला. यामुळे ॲमेझॉन इंक 4.61 टक्के, ॲपलमध्ये 2.84 टक्के मायक्रोस्फॉटमध्ये 3.20 टक्के उसळी घेतली. टेस्ला इंकचा शेअर जवळपास 65 टक्के वाढला. त्यामुळे या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या उद्योगपतींच्या संपत्तीत मोठी वाढ झाली.

हे सुद्धा वाचा

यादीत अमेरिकन अब्जाधीशांचा दबदबा ब्लूमबर्ग बिलेनिअर्स इंडेक्समधील टॉप-10 अब्जाधीशांनी गुरुवारी 25 अब्ज डॉलरची कमाई केली. यामध्ये मार्क झुकरबर्गच्या संपत्तीचा आकडा जोडला तर हा आकडा जवळपास 35 अब्ज डॉलर होईल. अब्जाधीशांच्या यादीत बर्नार्ड अर्नाल्ट 208 अब्ज डॉलरसह पहिल्या क्रमांकावर आहेत. तर 162 डॉलरसह एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर आहेत. 133 अब्ज डॉलरसह जेफ बेजोस तिसऱ्या क्रमांकावर, बिल गेट्स 122 अब्ज डॉलरसह चौथे, वॉरेन बफेट 115 अब्ज डॉलरसह 5 व्या क्रमांकावर, लॅरी एलिशन 107 अब्ज डॉलरसह सहाव्या, स्टीव वॉल्मर 106 अब्ज डॉलरसह 7 व्या क्रमांकावर, लॅरी पेज 99.1 अब्ज डॉलरसह 8 व्या स्थानी, या यादीत नवव्या क्रमांकावर सर्गी ब्रिन आहेत. गौतम अदानी या यादीत 21 व्या स्थानावर आहेत.

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.