Mukesh Ambani : मुकेश अंबानी हेच या देशासाठी आता ‘भगवान’; कर्जातून मुक्ती करणार, अर्थव्यवस्थेला असा बुस्टर डोस देणार

Mukesh Ambani Reliance Group : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आफ्रिकेत मोठा डाव टाकणार आहेत. मुकेश अंबानी या देशाच्या अर्थव्यवस्थाला पाठबळ देणार आहे. या देशाची अर्थव्यवस्था कर्जाच्या ओझ्यातून बाहेर काढणार आहे. त्यासाठी त्यांनी मोठी योजना आखली आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी हेच या देशासाठी आता 'भगवान'; कर्जातून मुक्ती करणार, अर्थव्यवस्थेला असा बुस्टर डोस देणार
मुकेश अंबानी ठरणार तारणहार
Follow us
| Updated on: Nov 02, 2024 | 11:13 AM

भारतात व्यापार आणि उद्योग विश्वात मोठा जम बसवल्यानंतर आता रिलायन्स जगभरात विस्तारत आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने आता आफ्रिकेवर लक्ष केंद्रीत केले आहे. आफ्रिकेला लागलेला गरीबीचा अभिशाप दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. यामुळे या देशाला कर्जाच्या विळख्यातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी येथील बॅकिंग आणि इंटरनेटची अडचण दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे येथे डिजिटल इकोनॉमीला चालना मिळणार आहे. या देशासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प ठरणार आहे.

बँकिंग व्यवस्थेला मोठी मदत

मुकेश अंबानी आफ्रिकेतील घाना या देशात मोठी खेळी खेळत आहे. हा देश संपूर्ण जगाला चांगल्या प्रतिची कॉपी पुरवतो. त्यासाठी तो प्रसिद्ध आहे. सध्या हा देश कर्जाच्या संकटात सापडला आहे. इथली बँकिंग सिस्टिम अपडेट करण्यात रिलायन्स मोलाची भूमिका बजावणार आहे. रिलायन्स याठिकाणी हायस्पीड ब्राँडबँक नेटवर्क विकसीत करण्याचे काम करणार आहे. येथील बँकिंग सिस्टिमला त्यामुळे चालना मिळणार आहे.

हे सुद्धा वाचा

स्वस्तात उपलब्ध करतील 5G कनेक्टिव्हिटी

मुकेश अंबानी यांच्या मदतीने घाना या देशात पहिले 5G नेटवर्क लाँच होणार आहे. या मदतीने तिथे ना केवळ जलदगतीने डेटा मिळेल. पण डेटा कॉस्ट पण कमी असेल. त्यामुळे येथील लोकांना त्याआधारे विविध क्षेत्रातील माहिती अपडेट ठेवता येईल. त्यांना जगाशी जलदगतीने संपर्क साधता येईल. अनेक मोठ्या बिझनेस डीलसाठी, ऑनलाईन बैठकींसाठी हायस्पीड इंटरनेटची गरज असते. या नवीन अद्ययावत सेवेमुळे आता त्यांना जगाशी बोलता येईल. नेक्स्ट जेन इंफ्रा कंपनीने शुक्रवारी देशातील पहिली 5G नेटवर्क सेवा सुरू केली आहे.

घानात उद्योग वाढीला चालना, अर्थव्यवस्थेला भरारी

या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हाय स्पीड इंटरनेटवर तिथलं सरकार लक्ष देत आहे. सध्या घानाची अर्थव्यवस्था कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली आहे. ईटीच्या एका वृत्तानुासर जुलै महिन्यात घानाचे राष्ट्रपती नाना अकुफो एड्डो यांनी 50.3 कोटी डॉलरची कर्ज योजना सुरू केली होती. त्याआधारे छोट्या आणि मोठ्या उद्योजकांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यांना पायाभूत सुविधा पुरवण्यावर लक्ष्य देण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'
दादांचे पुत्र पार्थ पवार म्हणाले, 'मी शरद पवार यांना भेटायला जाणार...'.
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?
नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात 10 सभा, कुठे-कधी असणार पंतप्रधान?.
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या...
राष्ट्रवादीत फूट, पहिल्यांदाच दोन पाडवा; सुप्रिया सुळे म्हणाल्या....
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?
'बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं', मुख्यमंत्र्यांचा कोणावर संताप?.
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट
'लाडक्या बहिणी'साठी आनंदाची बातमी, शिंदेंकडून योजनेसंदर्भात मोठी अपडेट.
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?
MNS deepotsav : दादार शिवाजी पार्कातील मनसेचे कंदील हटवले, कारण काय?.
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ
गोविंदबागेत शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यासाठी कार्यकर्त्यांची रिघ.
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्..
दादांना भेटण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची गर्दी, दोन दिवाळी पाडवे अन्...
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली
'बच्चू कडू लाचार...', रवी राणांचा पलटवार, पुन्हा एकदा जुंपली.
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम
'स्टॅम्पपेपरवर लिहून देतो..', अमित ठाकरेंविरोधात सदा सरवणकर ठाम.