नवी दिल्ली | 10 जानेवारी 2024 : गुजरातमध्ये उद्योजकांचा मेळा भरला आहे. व्हायब्रंट गुजरात-2024 चे उद्धाटन आज झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे उपस्थित होते. सालाबादाप्रमाणे देश-विदेशातील उद्योगपतींचा कुंभमेळा भरला. उद्धघाटन सत्रात रिलायन्स इंडस्ट्रीजये चेअरमन आणि अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तूती सुमने उधळली. पंतप्रधान मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी पंतप्रधान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच गुजरात राज्यात गुंतवणूकीसाठी अनेक घोषणा पण केल्या. तर इतर उद्योगपतींनी सुद्धा गुजरात राज्यात गुंतवणुकीविषयी मोठ्या घोषणा केल्या.
रिलायन्स गुजराती कंपनी
मुकेश अंबानी यांनी गुजरात राज्याला आधुनिक भारताचे वृद्धीचे प्रवेश द्वार असल्याचे सांगितले. रिलायन्स ही नेहमीच गुजरातची कंपनी होती आणि राहील असे ते म्हणाले. त्यांनी गुजराती असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले. परदेशातील लोक जेव्हा नवीन भारताविषयी विचार करतात, तेव्हा नवीन गुजरातविषयी पण विचार करतात. हा बदल झाला कशामुळे? मोदी यांच्यामुळे हा बदल झाला. ते जागतिक पटलावर मोठे नेते म्हणून समोर आल्याचे ते म्हणाले.
लवकरच सुरु करणार गीगा फॅक्टरी
मुकेश अंबानी हे गुजरात राज्यात बॅटरी उत्पादन प्रकल्प लवकरच सुरु करणार आहेत. वर्ष 2024 मधील दुसऱ्या तिमाहीत कंपनी गुजरातमध्ये गीगा फॅक्टरी सुरु करण्याची तयारी करत आहे. राज्याचा जीडीपी 2047 पर्यंत 3000 अब्ज डॉलरपर्यंत पोहचेल. तर भारताची अर्थव्यवस्था 35,000 अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. रिलायन्स गुजरातमधील हजीरा येथे भारतातील पहिला कार्बन फायबर सुविधा सुरु करणार आहे.
अदानी-मित्तल-टाटा-मारुतीची मोठी घोषणा