Mukesh Ambani: दुबईत मुकेश अंबानींनी खरेदी केले दुसरे घर, किंमत जाणून थक्कच व्हाल!

| Updated on: Oct 19, 2022 | 7:12 PM

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दुबईमध्ये एक महागडा बांगला खरेदी केला आहे. हा त्यांचा दुबईतील दुसरा बांगला आहे. त्याची किंमत...

Mukesh Ambani: दुबईत मुकेश अंबानींनी खरेदी केले दुसरे घर, किंमत जाणून थक्कच व्हाल!
मुकेश अंबानींचे दुबईतले घर
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई,  भारतीय उद्योगपती आणि आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी स्वतःचाच विक्रम मोडला आहे. मुकेश अंबानींनी यापूर्वी दुबईमध्ये 80 दशलक्ष डॉलरमध्ये घर  खरेदी (House in Dubai) केले होहोते आणि आता त्यापेक्षा दुप्पट किमतीत एक आलिशान बांगला त्यांनी  विकत घेतला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे  163 दशलक्ष डॉलर सांगितली जात आहे.

कसा झाला बंगल्याचा करार

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, मुकेश अंबानी यांनी काही महिन्यांत दुबईमध्ये हा दुसरा मोठा मालमत्ता व्यवहार केला आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्सच्या चेअरमनने कुवैती टायकून मोहम्मद अलशाया यांच्या कुटुंबाकडून पाम जुमेराह मॅन्शन सुमारे $163 दशलक्षला विकत घेतल्याचे अहवालात म्हटले आहे. यामध्ये या प्रकरणातील एका तज्ज्ञाच्या हवाल्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती देण्यात आली आहे.

सर्वात मोठ्या सौद्यांमध्ये समाविष्ट आहे हा करार

मुकेश अंबानींचा हा करार दुबईतील सर्वात महागड्या निवासी सौद्यांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. कुवेत-आधारित व्यवसाय समूह Alshaya कडे स्टारबक्स, H&M आणि Victoria’s Secret यासह प्रमुख किरकोळ ब्रँडसाठी स्थानिक फ्रेंचायझी आहेत.  मुकेश अंबानी यांनी पाम जुमेराहमध्ये मालमत्ता खरेदी केल्यानंतर, जगातील इतर अनेक श्रीमंत लोकांनी या भागात मालमत्ता खरेदी करण्यासाठी स्पर्धा लावली आहे.

हे सुद्धा वाचा

यावर्षी हा बांगला 80 दशलक्षमध्ये खरेदी करण्यात आला

अहवालानुसार, मुकेश अंबानी यांनी दुबईमध्ये विकत घेतलेला जुमेराह हवेली त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला $80 दशलक्षमध्ये विकत घेतलेल्या बंगल्यापासून हाकेच्या अंतरावर आहे. आधीच्या ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, 2022 च्या सुरुवातीला मुकेश अंबानी यांनी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीसाठी पाम जुमेरा बीचवर हा बांगला विकत घेतला होता.

आकाश अंबानीसाठी यूकेमध्ये घर

गेल्या वर्षी, रिलायन्स समूहाने यूकेमध्ये स्टोक पार्क लिमिटेड खरेदी करण्यासाठी $79 दशलक्ष खर्च केले. यामध्ये जॉर्जियन काळातील हवेलीचा समावेश आहे, जो मुकेश अंबानी यांनी त्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीसाठी विकत घेतला होता. त्याचवेळी, ताज्या अहवालानुसार, मुकेश अंबानी आता न्यूयॉर्कमध्येही मोठी मालमत्ता शोधत आहेत. विशेष म्हणजे, फोर्ब्सच्या मते, रिलायन्स चेअरमन 88.3 अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील आठव्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि गौतम अदानी नंतर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.