Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची अब्जावधींची खेळी! इतक्या स्टार्टअपची केली खरेदी

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांचे विस्ताराचे धोरण अजून आक्रमक होत आहे. रिलायन्स समूह आणि त्यांचा सहकारी कंपन्या अनेक ब्रँड्स टेकओव्हर करत आहेत. अथवा त्यांच्यात मोठी हिस्सेदारी, वाटा खरेदी करत आहेत. आता इतक्या स्टार्टअप्सची खरेदी करुन मुकेश अंबानी यांनी मोठी खेळी खेळली आहे.

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची अब्जावधींची खेळी! इतक्या स्टार्टअपची केली खरेदी
Follow us
| Updated on: Sep 02, 2023 | 3:15 PM

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : देशातीलच नाही तर आशियातील सर्वात मोठे श्रीमंत आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या या खेळीची सध्या उद्योग जगतात चर्चा आहे. त्यांनी स्टार्टअप्सवर मोठा डाव खेळला आहे. आता सध्या काही वर्षांपासून सार्टअप्स, युनिकॉर्नचे पीकं आले आहे. अनेक दिग्गज समूह अजूनही स्टार्टअप्सपासून चार हात दूर आहेत. पण रिलायन्सने त्यांच्यापेक्षा पुढचं पाऊल टाकलं आहे. त्यांनी अनेक स्टार्टअप्सचे (Startups) अधिग्रहण केले आहे. त्यासाठी पाण्यासारखे अब्जावधी रुपये ओतले. रिलायन्सचा कारभार रिटेल, ऊर्जा, गॅस, दूरसंचारसह आता इतर अनेक छोट्या-मोठ्या उद्योगात वाढला आहे. हा पसारा वाढला असला तरी विस्ताराची योजना थांबलेली नाही. इतके स्टार्टअप्स रिलायन्सने खरेदी केले आहे.

या Startups ची केली खरेदी

ऐडवर्ब (Addverb)

हे सुद्धा वाचा

ऐडवर्ब भारतातील एक वैश्विक रोबोटिक्स कंपनी आहे. इंट्रालॉजिस्टिक्स ऑटोमेशन क्षेत्रात या कंपनीचे भरीव काम आहे. हा स्टार्टअप रिलायन्स रिटेलने जानेवारी 2022 मध्ये 132 दशलक्ष डॉलरमध्ये खरेदी केला होता.

नेटमेड्स (Netmeds)

आजकाल ऑनलाईन मेडिसीन स्टोअर्स उघडली आहेत. त्यामाध्यमातून औषधं ऑनलाईन खरेदी करता येतात. ती घरपोच मिळतात. नेटमेड्स ही ऑनलाईन औषधी विक्री करणारी कंपनी आहे. ऑगस्ट 2020 मध्ये 620 कोटी रुपयांना नेटमेड्स खरेदी केले.

रॅडिसिस (Radisys)

रॅडिसिस, ही दूरसंचार क्षेत्रातील अडचणी, समस्या सोडविणारी कंपनी आहे. ही कंपनी ग्राहकांना डिजिटल सेवा देते. जून 2018 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने 74 दशलक्ष डॉलरमध्ये ही कंपनी ताब्यात घेतली होती.

मिमोसा नेटवर्क (Mimosa Networks)

मिमोसा नेटवर्क, वायरलेस ब्रॉडबँडमधील अग्रगण्य कंपनी आहे. ऑगस्ट 2023 मध्ये Jio ने 60 दशलक्ष डॉलरमध्ये या कंपनीची खरेदी केली होती.

एम्बाईब (Embibe)

एम्बाईब एक AI-आधारित अड-टेक प्लेटफॉर्म आहे. ही कंपनी जेईई, एसएससी आणि इतर परीक्षा, तसेच स्पर्धा परीक्षांसाठी खास शिक्षण, कोचिंग देते. अड-टेकला फेब्रुवारी 2020 मध्ये 90 कोटी रुपयांची गुंतवणूक उपलब्ध झाली होती. त्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजने या कंपनीत 500 कोटींची गुंतवणूक केली.

हॅप्टिक (Haptik)

हॅप्टिक कंपनी इतरांना AI-आधारीत मदत पोहचवते. ती इतर कंपन्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी मदत करते. कंपनीला एप्रिल 2019 मध्ये 102.3 दशलक्ष डॉलर मध्ये रिलायन्स जिओ डिजिटल सर्व्हिसेच्या माध्यमातून खरेदी करण्यात आले होते.

रेव्हेरी (Reverie)

रेव्हेरी, एक क्लाउड-आधारीत भाषांतराचे व्यवस्थापन करणारा प्लॅटफॉर्म आहे. यामाध्यमातून भारतातील अनेक भाषांमध्ये अनुवाद, भाषांतर करता येते. आवाजाच्या सहाय्याने सर्च करणे, भाषांतर करणे अशी कामे करण्यात येतात. 2019 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट अँड कंपनीने या कंपनीची खरेदी केली.

फाईंड (Fynd)

किरकोळ व्यापाऱ्यांसाठी हा प्लॅटफॉर्म सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाचे काम करतो. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना मोठा फायदा होतो. या प्लॅटफॉर्मची खरेदी इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट अँड कंपनीने केली. 2019 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

क्लोविया (Clovia )

महिलांसाठी कपडे तयार करणारी ही खास कंपनी मार्च 2022 मध्ये रिलायन्स समूहात दाखल झाली. रिलायन्स रिटेलने 950 कोटी रुपयांत ही कंपनी खरेदी केली होती. त्यामार्फत रिटेलच्या विविध शॉपिंग मालमध्ये कपड्यांचा पुरवठा होतो.

टेसेरॅक्ट (Tesseract)

तंत्रज्ञानावर आधारीत टेसेरॅक्ट कंपनी एप्रिल 2019 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये दाखल झाली. या कंपन्यांच्या अधिग्रहणामुळे रिलायन्सला त्यांचा विस्तार झपाट्याने करता आला. तसेच इतर मालासाठी, सेवांसाठी बाहेरील कंपन्यांवर अवलंबून राहण्याची गरज उरली नाही.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.