Mukesh Ambani | अनंतच्या प्रत्येक शब्दाने मनात केले घर; मुकेश अंबानी यांना रोखता आले नाहीत अश्रू

Mukesh Ambani | अनंत अंबानी याच्य प्री-वेडिंगचा इव्हेंट जामनगर येथे सुरु आहे. या सोहळ्यात अनंत अंबानी याच्या मनोगताने सर्वांचीच मनं जिंकली. तर आपल्या धाकट्याचे बोल ऐकून रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी भावूक झाले. मुलाच्या भावनिक प्रतिसादाने त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. काय म्हणाले अनंत अंबानी?

Mukesh Ambani | अनंतच्या प्रत्येक शब्दाने मनात केले घर; मुकेश अंबानी यांना रोखता आले नाहीत अश्रू
Follow us
| Updated on: Mar 03, 2024 | 9:31 AM

नवी दिल्ली | 3 March 2024 : अनंत अंबानी याच्या लग्नपूर्व सोहळ्याची सध्या देशभर चर्चा रंगली आहे. कारण ही तसंच आहे. या कार्यक्रमाला जगभरातील दिग्गज उपस्थित आहेत. तर बॉलिवूड आणि भारतीय उद्योजकांचा पण राबता आहे. पण या सोहळ्यात काल एक भावनिक वातावरण पाहायला मिळाले. अनंत अंबानी याने या कार्यक्रमात मनातील भावना व्यक्त केल्या. अनेक आठवणींना उजाळा दिला. त्याचे या शब्दांनी रिलायन्स समूहाचे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या मनात घर केले. त्यांना भावनेचा आवेग रोखता आला नाही. हा बाप माणूस या कार्यक्रमादरम्यान रडला. त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. यावेळी अनंत यांनी आई-वडिलांच्या कष्टाचा उल्लेख करत, इतके चांगले आयुष्य दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

काय म्हणाले अनंत?

माझे आयुष्य पूर्णपणे गुलाबाच्या बिछान्यावर लोळण्यात गेले नाही. मला काटे पण बोचले आहे. आरोग्याच्या तक्रारीने माझे बालपण दुखदायी ठरले. पण माझ्या आई-वडिलांनी मला हे दुखणे झेलण्याची वेळोवेळी ताकद दिली. त्यांनी हे दुख मला जाणवू दिले नाही. त्यांनी प्रत्येक वेळी माझी काळजी घेतली. ते प्रत्येक वेळी माझ्यासोबत होते. अनंतने यावेळी त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. अनंत मनोगत व्यक्त करत असताना मुकेश अंबानी यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांना भावना रोखता आल्या नाहीत. ते भावूक झाले.

हे सुद्धा वाचा

1 हजाराहून अधिक पाहुणे

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटला या आठवड्यात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सामुहिक जेवणाची मेजवाणी होती. त्यात आसपासच्या गावातील लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. गुजराती जेवणाने रंगत वाढवली. जामनगरमधील तीन दिवसांच्या कार्यक्रमात पहिल्या दिवशी बिल गेट्स आणि मार्क झुकरबर्ग यांच्यास अनेक दिग्गजांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. 1,000 अधिक पाहुण्यांनी येथे हजेरी लावली. यामध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमिर खानसह इतर अनेक सुपरस्टार सहभागी झाले.

रिहाना पहिल्यांदा भारतात

या कार्यक्रमात लोकप्रिय गायिका रिहानाने पण हजेरी लावली. शुक्रवारी तिने भारतात पहिल्यांदा अदाकारी दाखवली. तिच्या काही सुपरहिट गाण्यांमध्ये ‘डायमंड्स’, ‘रूड बॉय’, ‘पोर इट अप’, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनंत-राधिका यांचा रेकॉर्ड

मीडियातील वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या लग्नात जवळपास 1,000 कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हे लग्न कुटुंबातील सर्वात महागडे लग्न असेल. तर देशातील पण महागडे लग्न ठरेल. ईशाच्या लग्नात मिक्का सिंग याने 10 मिनिटांच्या शो साठी दीड कोटी रुपये घेतले होते.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.