Isha Ambani : मुकेश अंबानी यांचा ॲंटिलियाही पडला यापुढे फिक्का! कसा आहे मुलगी ईशाचा आलिशान बंगला

Isha Ambani : भारतातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या ॲंटिलिया या बंगल्याची मोठी चर्चा रंगली होती. पण त्यापेक्षा त्यांच्या मुलीच्या बंगल्याची आता जोरात चर्चा सुरु आहे. हा आलिशान बंगला पाहण्यासाठी दूर दूरन लोक येतात.

Isha Ambani : मुकेश अंबानी यांचा ॲंटिलियाही पडला यापुढे फिक्का! कसा आहे मुलगी ईशाचा आलिशान बंगला
Follow us
| Updated on: Mar 08, 2023 | 9:32 AM

नवी दिल्ली : भारतातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या ॲंटिलिया (Antilia) या बंगल्याची मोठी चर्चा रंगली होती. पण त्यापेक्षा त्यांच्या मुलीच्या बंगल्याची आता जोरात चर्चा सुरु आहे. ईशाने (Isha Ambani) उद्योजक आनंद पिरामल यांच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या सासऱ्याने त्यांना एक आलिशान बंगला गिफ्ट केला आहे. या आलिशान वास्तूची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. या बंगल्याच्या काही फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा काही साधा बंगला नाही. तर हा 3 D बंगला आहे. कोट्यवधींच्या या बंगल्यातील इंटेरिअरवरही नेटिझन्स फिदा आहे. या बंगल्याने त्यांच्या श्रीमंतीला चार चांद लावल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ॲंटिलिया जगातील सर्वात श्रीमंत घर मानले जाते. पण हा बंगलाही इशिताच्या आलिशान बंगल्यासमोर ( Luxurious Bunglow) फिक्का वाटतो.

ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामल यांना लग्नाची भेट म्हणून हा 452 कोटी रुपयांचा आलिशान बंगला देण्यात आला. ईशाचे सासरे अजय पिरामल यांनी हा बंगला भेट म्हणून दिला आहे. मुकेश अंबानी यांचा बंगला ॲंटिलिया हा जगातील काही महागड्या घरांपैकी एक आहे. तर ईशा अंबानी हिचा आलिशान बंगला हा 3 D तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा महल 11 मीटर उंच आणि 50000 वर्ग फुटावर पसरलेला आहे.

ईशा अंबानी यांचा हा बंगला मुंबईतील वरळी परिसरात आहे. या आलिशान बंगल्यातून अरब सागर आणि सी लिंकचा ब्रिजचा नजराही डोळ्यांचे पारणे फेडतो. ईशा अंबानी आणि त्यांचे पती आनंद यांनी या बंगल्याचे नाव गुलीटा असे ठेवले आहे. ईशा अंबानी यांच्या या घरात तीन बेसमेंट आहेत. पहिल्या बेसमेंटमध्ये एक बगिचा आणि खुला स्वीमिंग पूल आहे. दुसऱ्या बेसमेंटमध्ये सर्व्हिसेस तर तिसऱ्या बेसमेंटमध्ये वाहन व्यवस्था आहे.

हे सुद्धा वाचा

अजय पिरामल यांनी या बंगल्याचे काम 2012 मध्येच सुरु केले होते. ईशा अंबानी आणि आनंद यांच्या लग्नापर्यंत या बंगल्याचे काम सुरुच होते. नुकतेच हे दोघे या आलिशान बंगल्यात रहायला आले आहेत. या बंगल्याचे इंटिरिअर खूपच शानदार आहे. प्रत्येक फ्लोअरवर खास रुम तयार करण्यात आल्या आहेत. सजावटही अत्यंत सुरेख आणि डोळ्यांचं पारणं फेडणारी आहे. हा बंगला सुंदर तर आहेच, पण मौल्यवानही आहे.

ईशा अंबानी (Isha Ambani) मुकेश आणि नीता अंबानी यांची मुलगी आहे. त्या सध्या जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या संचालक मंडळात आहे. 2014 मध्ये त्यांचे नाव आशियातील 12 शक्तिशाली भविष्यातील उद्योजिकांमध्ये घेण्यात आले होते. त्यांनी उद्योजक आनंद पीरामल यांच्यासोबत 2018 मध्ये लग्न केले आहे. सासू सारख्याच त्या कर्तबगार महिला आहेत.

मुकेश अंबानी यांची पत्नी आणि ईशा अंबानी यांची आई नीता अंबानी (Nita Ambani) यांना सर्वच जण वहिनी म्हणतात. मुंबई इंडियन्स क्रिकेट टीमची फ्रेंचाईज मागे नीता अंबानी यांचे परिश्रम आहेत. त्या रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी मोठी भूमिका पार पाडतात. अनिल अंबानी यांनी तक्रार केली होती की, नीता, आनंद जैन आणि मनोज मोदी यांना झुकते माप देण्यात येते.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.