IPL 2023 : तुम्ही आयपीएलचा आनंद लुटा, मुकेश अंबानी यांची होईल जबरदस्त कमाई!

IPL 2023 : आयपीएलचा सीझन आहे, त्यात प्रेक्षक आनंद लुटत आहे. पण रिलायन्स या काळात जोरदार कमाई करत आहे. आयपीएल केवळ सामान्यातील क्रिकेटचा थरारच नाही तर कमाईचे मोठे कुरण आहे.

IPL 2023 : तुम्ही आयपीएलचा आनंद लुटा, मुकेश अंबानी यांची होईल जबरदस्त कमाई!
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 11:11 AM

नवी दिल्ली : टी-20 क्रिकेट टुर्नामेंट, इंडियन प्रीमिअर लीग पुन्हा धडाक्यात सुरु झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून आयपीएल मॅचेस (IPL 2023) या क्रिकेटचा आनंद मेळाच नाहीतर कमाईचे पण कुरण ठरत आहेत. जगातील ही मोठी स्पोर्ट लीग ठरली आहे. आयपीएल पाहण्यासाठी आणि खेळाचा आनंद लुटण्यासाठी प्रेक्षकांची एकच गर्दी उसळली. किक्रेटच्या मैदानात जेवढी गर्दी आहे, त्यापेक्षा अधिक ती ऑनलाईन आहे. यामाध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार, यंदाच्या आयपीएलमध्ये फक्त टीव्ही आणि डिजिटल जाहिराती (IPL Advertising) 5000 कोटींहून अधिक कमाई करुन देणार आहेत. यात मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सला तर लॉटरी लागणार आहे.

जास्त कमाईसाठी जोरदार टक्कर

ईटीने दिलेल्या वृत्तानुसार, या महाकुंभात प्रत्येकाला कमाई करायची आहे. इंडियन प्रीमिअम लीगच्या नवीन आवृत्तीसाठी डिज्नी स्टार आणि मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहात जोरदार टक्कर सुरु आहे. रिलायन्सचा वायकॉम 18 या कंपन्या खोऱ्यानं जाहिराती आणण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत. डिजिटल जाहिरातींच्या माध्यमातूनच 5000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडल्या जाणार आहे. या दोन्ही कंपन्यांच्या जाहिरात आणि इतर व्यवहार संभाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते, दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या जोरदार स्पर्धा सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

टीव्ही आणि डिजिटल राईट्स वेगळे

या वर्षात टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी आयपीएल मीडियाचे राईट्स, अधिकार वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. म्हणजे टीव्ही आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळ्या कंपन्या जाहिराती करतील. गेल्यावर्षी हे दोन्ही अधिकार डिज्नी स्टारकडे होते. यंदा टिव्ही जाहिरातीसाठी डिज्ने स्टारकडे अधिकार आहेत. तर मुकेश अंबानी या कंपनीला डिजिटल अधिकार मिळाले आहेत.

काय आहेत डील्स

याप्रकरणी एका अधिकाऱ्याने माहिती दिली आहे की, डिज्नी स्टारने यापूर्वीच 2,400 कोटी रुपयांची स्पॉन्सरशिप डील केली आहे. तर ही कंपनी अतिरिक्त 600 कोटी रुपयांच्या डील साठी मैदानात चर्चा सुरु आहे. तर वायाकॉम18 ने 2,700 कोटी रुपयांचे करार पूर्ण केले आहेत. तर या कंपनीने जाहिरातीच्या उत्पन्नातून 3,700 कोटी रुपये जमाविम्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे.

मोफत आयपीएल

आयपीएल मोफत दाखविण्याची रिलायन्स यापूर्वीच खेळी खेळली होती. गेल्या वर्षभरापासून याविषयीची तयारी सुरु होती. त्यासाठी पॅरामाऊंट ग्लोबल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित Viacom-18 ने IPL चा ब्रॉडकॉस्ट मीडिया अगोदरच ताब्यात घेतला होता. गेल्या वर्षी यासंबंधीची $2.7 अब्जची डील पूर्ण झाली. अर्थात हा सौदा सहजासहजी झाला नाही. आयपीएलचे हक्क विकत घेण्यासाठी वायाकॉमने बाजारातील डिस्ने प्ल्स हॉटस्टार, सोनी ग्रूपसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना आस्मान दाखविले. Viacom मोफत लाइव्ह स्ट्रीमिंग ऑफर देणार असल्याने प्रेक्षकांच्या, क्रीडा प्रेमींच्या आणि किक्रेटप्रेमींच्या उड्या पडल्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.