Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मुसंडी, आघाडीच्या श्रीमंतांत पुन्हा एंट्री

Mukesh Ambani : जागतिक श्रीमंतांच्या यादीत बऱ्याच महिन्यात नंतर मोठा उलटफेर दिसून आला. या यादीत गेल्या काही वर्षांपासून अमेरिकन श्रीमंतांचा दबदबा कायम आहे. टॉप-10 मध्ये तर अमेरिकेचच वर्चस्व आहे. पण या यादीत आता भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांनी एंट्री घेतली आहे. या यादीत समावेश असलेले ते एकमेव आशिया व्यक्ती पण ठरले आहेत. 

Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांची मुसंडी, आघाडीच्या श्रीमंतांत पुन्हा एंट्री
Follow us
| Updated on: Oct 05, 2023 | 3:45 PM

नवी दिल्ली | 5 ऑक्टोबर 2023 : अमेरिकेतील बिझनेस मॅगझिन Forbes ने त्यांची श्रीमंतांची यादी अपडेट केली आहे. या यादीत अमेरिकन अब्जाधीशांचा दबदबा कायम आहे. दहापैकी जवळपास 9 श्रीमंत व्यक्ती अमेरिकेच्या आहेत. पण या यादीत पहिल्या क्रमांकावर फ्रेंच अब्जाधीश बर्नार्ड अर्नाल्ट यांनी बाजी मारली. ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 211 अब्ज डॉलर आहे. ते जागतिक फॅशन ब्रँड Louis Vuitton चे मालक आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर टेस्लाचे सीईओ Elon Musk आहेत. त्यांच्याकडे 180 दशलक्ष डॉलरची संपत्ती आहे. त्यानंतर या यादीत मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी top 10 मध्ये क्रमांक पटकावला आहे. त्यांच्यी एकूण संपत्ती 83.4 दशलक्ष डॉलर इतकी आहे.

श्रीमंती घटली

Forbes च्या यादीनुसार, यादीतील श्रीमंतांची संपत्ती घसरली आहे. गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या संपत्तीत घट आली आहे. त्यांचे शेअर घसरत आहेत, नफा कमी होत आहे. तर घेतलेल्या कर्जावरील व्याज वाढल्याचा फटका त्यांना बसला आहे. त्यांच्या संपत्तीत मोठी घसरण आली आहे. या यादीत मुकेश अंबानी यांनी पुन्हा एंट्री घेतली आहे.

हे सुद्धा वाचा

मस्क दुसऱ्या क्रमांकावर

एलॉन मस्क हे या यादीत 2022 पहिल्यांदा पहिल्या स्थानावर होते. पण नंतर ते दुसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. ट्विटरचा सौदा त्यांना महागात पडला. ट्विटरची घडामोड त्यांच्या चांगलीच अंगलट आली. मनस्ताप, जगभरातून हेटाळणी, कर्मचाऱ्यांची, युझर्सची नाराजी आणि अनेक घटना प्रतिकूल घडल्या. ट्विटरचे नाव बदलून ते X ठेवण्यात आले आहे. आता लोगो पण बदलण्यात आला आहे.

जेफ बेजोस तिसऱ्या क्रमांकावर

Amazonचे सीईओ जेफ बेजोस हे या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांच्यानंतर लॅरी इलिसन, प्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरेन बफे, मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, मायकल ब्लूमबर्ग यांचा पण उतरत्या क्रमाने या यादीत समावेश आहे. हे जगातील टॉप-10 अब्जाधीशांपैकी आहेत. यामध्ये भारतीय अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा पण क्रमांक आहे.

अंबानी या क्रमांकावर

मुकेश अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आहेत. टॉप-10 मध्ये असलेले ते एकमेव भारतीयच नाही तर आशियाई व्यक्ती आहेत. त्यांच्या व्यवसायाचा पसारा मोठा आहे. पेट्रोकेमिकल्स, तेल आणि नैसर्गिक गॅस, रिलायन्स रिटेल, टेलिकॉम, अक्षय ऊर्जा यासह इतर अनेक क्षेत्रात रिलायन्सचा दबदबा आहे. या समूहाची स्थापना त्यांचे वडील धीरुभाई अंबानी यांनी 1966 मध्ये केली होती.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.