Mukesh Ambani यांच्या कंपनीने केले मालामाल! गुंतवणूकदारांची कमाई छप्परफाड 

| Updated on: Dec 24, 2023 | 3:09 PM

Mukesh Ambani | गेल्या आठवड्यात शेअर बाजाराने भूर्रकन झेप घेऊन त्याच वेगाने कोसळण्याचा प्रयोग केला. त्यात अनेक गुंतवणूकदारांची कमाई स्वाहा झाली. पण आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने गुंतवणूकदारांना मोठा फायदा मिळवून दिला. या काळात गुंतवणूकदारांना 50,000 कोटी रुपयांचा फायदा झाला.

Mukesh Ambani यांच्या कंपनीने केले मालामाल! गुंतवणूकदारांची कमाई छप्परफाड 
Follow us on

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : शेअर बाजारात गेल्या आठवड्यात गुंतवणूकदारांना मोठा झटका बसला. गगन भरारी घेतल्यानंतर शेअर बाजार दणक्यात आपटला. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध टॉप-10 कंपन्यांमध्ये सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठी घसरण झाली. तर तीन कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला. अशा वाईट परिस्थितीत पण गुंतवणूकदारांची नाव बुडू दिली नाही. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने जोरदार घौडदौड केली. गुंतवणूकदारांना या स्टॉकने छप्परफाड कमाई करुन दिली.

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले

देशातील सर्वाधिक मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यातील पाच व्यापारी सत्रात जवळपास 50,000 कोटी रुपयांची कमाई करुन दिली. PTI नुसार, रिलायन्सचे मार्केट कॅपिटलायझेशन या कालावधीत 47,021.59 कोटी रुपयांनी वाढले. त्यानंतर कंपनीचे मूल्य वाढून 17,35,194.85 कोटी रुपयांच्या स्तरावर पोहचले. या आकड्यानुसार, मुकेश अंबानी यांच्या फर्मचे मूल्य या हिशोबाने सर्वाधिक आहे.

हे सुद्धा वाचा

या कंपन्या पण आघाडीवर

रिलायन्स इंडस्ट्रीजशिवाय इतर दोन कंपन्यांनी पण मोठा फायदा मिळवून दिला. यामध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड(HUL) आणि खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक (HDFC Bank) यांचा समावेश आहे. या कालावधीत एचयुएलचे मार्केट कॅप 12,241.37 कोटी रुपयांनी वाढले आणि ते 6,05,043.25 कोटी रुपयांवर पोहचले. तर एचडीएफसी बँकेचे बाजारातील भांडवलात 11,049.74 कोटी रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. त्यात वाढ होऊन मार्केट कॅप 12,68,143.20 कोटी रुपयांवर पोहचले.

देशातील टॉप-10 कंपन्या

बाजारातील भांडवलाआधारे देशातील टॉप-10 कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज ही पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर क्रमशः टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारतीय स्टेट बँक, आयटीसी, एअरटेल आणि एलआयसी या त्या कंपन्या आहेत.

या कंपन्यांना फटका

गुंतवणूकदारांना फटका देण्यात आयसीआयसीआय बँक आघाडीवर आहे. या बँकेच्या शेअरमध्ये 30,235.59 कोटींची घसरण झाली. टाटा समूहाच्या टीसीएसच्या बाजार भांडवलात 12,715.21 कोटी रुपयांची घसरण झाली. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयचे मूल्य 5,68,185.42 कोटी रुपयांवर आले. तर गुंतवणूकदारांना 10,486.42 कोटी रुपयांचा फटका बसला.