मुकेश अंबानींच्या शानदार ‘बँक्वेट हॉल’मध्ये करायचंय लग्न ? एका दिवसाचं भाडं आहे फक्त…

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन जवळपास संपूर्ण जगाने पाहिलं. अनंत अंबानी यांनीही या कार्यक्रमाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'वेड इन इंडिया'पासून प्रेरित असल्याचे सांगितले. अशा वेळी तुम्हीही मुकेश अंबानींच्या 'बँक्वेट हॉल'मध्ये लग्न करून 'वेड इन इंडिया'चा भाग बनू शकता.

मुकेश अंबानींच्या शानदार ‘बँक्वेट हॉल’मध्ये करायचंय लग्न ? एका दिवसाचं भाडं आहे फक्त...
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 3:43 PM

मुंबई | 21 मार्च 2024 : सेलिब्रिटींप्रमाणे शानदार, डेस्टिनेशन लग्न करावं अशी अनेकांची इच्छा असते. पण प्रत्येकालाच ते शक्य असतं असं नाही. काही वेळा बजेट आड येतं तर काहींची इतर अडचण असते. तुम्हालाही सेलिब्रिटींप्रमाणे कमी खर्चात मोठ्या ठिकाणी लग्न करायचे आहे का ? तुम्हालाही तुमचे लग्न खूप भव्यदिव्य व्हावे असे वाटते का, मग आता ते शक्य आहे भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘बँक्वेट हॉल’मध्ये तुम्ही लग्नाचं हे स्वप्न साकार करू शकता. अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी मुंबईत एक अशी जागा विकसित केली आहे जिथे तुम्हाला शानदार स्टाईलमध्ये लग्न करण्याची संधी मिळेल. त्याचं भाडं किती आहे ते जाणून घेऊया..

मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन जवळपास संपूर्ण जगाने पाहिलं. अनंत अंबानी यांनीही या कार्यक्रमाचे वर्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वेड इन इंडिया’पासून प्रेरित असल्याचे सांगितले. अशा वेळी तुम्हीही मुकेश अंबानींच्या ‘बँक्वेट हॉल’मध्ये लग्न करून ‘वेड इन इंडिया’चा भाग बनू शकता.

कसा आहे मुकेश अंबानींचा ‘ बँक्वेट हॉल’ ?

मुकेश अंबानी यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये ‘जिओ वर्ल्ड गार्डन’ उघडले आहे. लॅक्मे फॅशन वीकपासून ते अनेक अवॉर्ड शोपर्यं, बऱ्याच सोहळ्यांसाठी याचा वापर करता येतो. पण त्याचसोबत ही जागा एक भव्य वेडिंग डेस्टिनेशन म्हणून लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. इथे तुम्हाला चांगल्या सुविधांसोबतच उत्कृष्ट निसर्गसौंदर्यही पहायला मिळते. जिओ वर्ल्ड गार्डन हे सुमारे 5 लाख स्क्वेअर फूटवर पसरले आहे. हे मुंबईचे सर्वात मोठे ओपन-एअर ठिकाण आहे, ज्यामध्ये आरामदायी बसण्याची जागा, ऊर्जा निर्माण करणारी सोलर ट्री, शांतता देणार भव्य तलाव, अशा अनेक गोष्टी आहेत. इतकंच नाही तर त्याच्याशी संलग्न असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, लक्झरी हॉटेल, शॉपिंग मॉल, परफॉर्मिंग आर्ट थिएटर, रूफ टॉप ड्राईव्ह-इन मूव्ही थिएटर, वाय-फाय अशा अनेक सुविधाही मिळतात. Jio वर्ल्ड गार्डनमध्ये तुम्ही 2,000 वाहने देखील पार्क करू शकता.

एका दिवसाचं भाडं किती ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्हाला जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये लग्न करायचे असेल तर तुम्ही वेगवेगळ्या पॅकेजनुसार येथे बुकिंग करू शकता. सुरुवातीच्या पॅकेजची किंमत प्रतिदिवसासाठी फक्त 15 लाख रुपयांपासून सुरू होते. ज्या दिवशी येथे कोणतेही कार्यक्रम किंवा सोहळे नसतात, तेव्हा तुम्ही फक्त 10 रुपये शुल्क भरून या संपूर्ण जिओ गार्डनला भेट देऊ शकता.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.