Mukesh Ambani : मुकेश अंबानींचं स्पेशल गिफ्ट, आज जिओचं रीचार्ज केलं तर…
तुम्ही जिओ यूजर असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी यांनी आपल्या युजर्ससाठी खास फेस्टिव ऑफर आणली आहे. जर तुम्ही आज Jio चे हे रिचार्ज केले तर तुम्हाला 72 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल. या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित डेटा आणि Jio Cinema चे फ्री सब्सक्रिप्शन देखील मिळणार आहे.
आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी हे सदैव चर्चेत असतात. त्यांनी Jio युजर्ससाठी एका खास फेस्टिव्ह ऑफर आणली आहे. जिओ यूजर्सना कमी किमतीत दीर्घकाळ चालणारे रिचार्ज प्लॅन मिळत आहेत. जर तुम्ही आज Jioचे रिचार्ज केले तर तुम्हाला प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा, जिओ सिनेमा सबस्क्रिप्शन आणि अमर्यादित व्हॉईस कॉलिंगचा लाभही मिळणार आहे. विशेष म्हणजे जिओचा हा रीचार्ज प्लान 72 आणि 84 दिवसांची व्हॅलिटीडी ऑफर करत आहे. 749 आणि 1029 रुपयांमध्ये तुम्हाला जास्त व्हॅलिडिटी सह अनलिमिटेड डेटासुद्धा मिळणार आहे. या प्लानचे संपूर्ण डिटेल्स जाणून घेऊया.
जिओचा 749 रुपयांचा प्लान
जिओच्या या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसाची नव्हे तर त्याऐवजी 72 दिवसांची व्हॅलिडिटी मिळणार आहे. त्यामध्ये यूजर्सना 72 दिवसांसाठी अमर्यादित डेटा, अमर्यादित व्हॉइसकॉलिंग आणि Jio सिनेमाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळू शकते. या प्लानमध्ये तुम्हाला एकूण 164 GB डेटा मिळतो. तुम्ही दररोज हाय स्पीड 2 GB डेटा आणि + 20 GB डेटाचा लाभ घेऊ शकता. म्हणजे एक प्रकारे हा यूजर्ससाठी अमर्यादित डेटा आहे.
तुम्ही दिवसभर इंटरनेट वापरत असलात तरी तुम्ही 2 किंवा 3 जीबीपेक्षा जास्त वापर करू शकत नाही. याशिवाय, तुम्हाला दररोज ऑफलाइन चॅटिंग करण्याची संधी मिळत आहे. काहीवेळा जर इंटरनेट काम करत नसेल तर तुम्ही दररोज 100 एसएमएसचा लाभ देखील घेऊ शकता. मनोरंजनासाठी, Jio Cinema, Jio TV आणि Jio Cloud वर ॲक्सेस देखील मिळणार आहे.
1029 रुपयांच्या प्लानमध्ये फ्री ॲमेझॉन प्राईम
या प्लानमध्ये जिओ यूजर्सना 84 दिवसांची वैधता मिळते. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्लॅनमध्ये यूजर्सना दोन OTT प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन मोफत मिळत आहे. या प्लॅनमध्ये यूजर्स हे Jio Cinema आणि Amazon Prime Lite चे सबस्क्रिप्शन देखील मिळवू शकता. या प्लॅनमध्ये एकूण 168 GB फ्री डेटा उपलब्ध आहे. तुम्ही दररोज हाय स्पीड 2 GB डेटाचा आनंद घेऊ शकता. अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस विनामूल्य उपलब्ध असतील. त्यामुळे यूजर्ससाठी ही चांगली संधी आहे.