बाजार मामुली तेजीत आणि मुकेश अंबानींच्या संपत्ती एका दिवसात 22 हजार कोटींची भर
या आठवड्यात शेअर बाजार सुरुवातीच्या चार दिवस घसरण होऊन बंद झाला (Mukesh Ambanis Net Worth).
मुंबई : या आठवड्यात शेअर बाजार सुरुवातीच्या चार दिवस घसरण होऊन बंद झाला (Mukesh Ambanis Net Worth). पण, व्यावसायिक सत्रात सेंसेक्समध्ये 641 अंकांची तेजी नोंदवण्यात आली. या तेजीमुळे शेवटच्या दिवशी गुंतणूकदारांच्या एकूण संपत्तीत एकूण 2.32 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बाजारात आलेल्या या तेजीमुळे मुकेश अंबानींच्या संपत्तीत एका दिवसात 3.03 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 22 हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे ते सध्या जगातील दहावे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत (Mukesh Ambanis Net Worth Rise By 22 Thousand Crore Top 10 Bloomberg Billionaire Index ).
ब्लुमबर्ग बिलिनेअर इंडेक्सनुसार, मुकेश अंबानींची एकूण संपत्ती 81 अरब डॉलर आहे. या वर्षात आतापर्यंत त्यांच्या संपत्तीत 4.32 डॉलर म्हणजेच 312.95 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या 181 अरब डॉलरसोबत जेफ बेजोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 170 अरब डॉलरच्या संपत्तीसह एलन मस्क दूसऱ्या स्थानावर आहेत. 138 अरब डॉलरच्या संपत्तीसहबिल गेट्स हे तिसऱ्या स्थानावर आहेत.
आठवड्याच्या आधारावर सेंसेक्समध्ये 934 अंकांची घसरण
शेवटच्या दिवशी शेअर बाजारात तेजी आली असेल तरी आठवड्याच्या आधारे सेंसेक्समध्ये 934 अंकांची घसरण झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात BSE लिस्टेड कंपन्यांचा मार्केट कॅप 207.89 लाख कोटी रुपये होता जो कमी होऊन 203.44 लाख कोटी रुपयांवर आला. या प्रकारे गुंतवणूकदारांचे 4.45 लाख कोटी रुपए बुडाले.
रिलायन्सचं मार्केट कॅप 13.41 लाख कोटी
रिलायन्सच्या शेअरच्या प्रदर्शनावर लक्ष दिलं तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मार्केट कॅप 13 लाख 41 हजार 869 कोटी रुपयांवर बंद झाला आहे. आठवड्याच्या अखेरीस व्यावसायिक सत्रात कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 3.63 टक्क्यांची तेजी म्हणजेच जवळपास 73 रुपयांची तेजी आली आणि 2082 रुपए प्रति शेअरच्या स्तरावर बंद झालं. 9 मार्चपासून सतत शेअरचा भाव पडत होता. शेवटच्या दिवशी तेजीनंतरही आठवड्याच्या आधारे यामध्ये 2.60 टक्क्यांची घसरण झाली आहे.
Crorepati calculator : विना Risk तुम्हीही होऊ शकता लखपती, फक्त रोज करा 20 ते 50 रुपयांची बचतhttps://t.co/RBX0R6cQWP#postoffice #savings #Banking #earnmoney #makemoney
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 20, 2021
Mukesh Ambanis Net Worth Rise By 22 Thousand Crore Top 10 Bloomberg Billionaire Index
संबंधित बातम्या :
Bond Yield मध्ये तेजी, या आठवड्यात सोनं 45 हजारांवर, लग्नाआधी किंमतीत वाढ
करदात्यांसाठी अलर्ट! आजच करा ‘हे’ काम नाहीतर भरावा लागेल मोठा दंड