Mukesh Ambani : गुंतवणूकदारांना रिलायन्सची लॉटरी, असा येणार पैसा

Mukesh Ambani : गुंतवणूकादारांना आज रिलायन्सची लॉटरी लागणार आहे. त्यांना मोठा फायदा होईल. रिलायन्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आजचा खास दिवस आहे. त्यांना लाभांश देण्याची पण घोषणा होऊ शकते.

Mukesh Ambani : गुंतवणूकदारांना रिलायन्सची लॉटरी, असा येणार पैसा
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 8:50 AM

नवी दिल्ली | 20 जुलै 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी घेऊन आले आहेत. देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industry) 36 लाखांहून अधिक गुंतवणूकदारांना मालामाल करणार आहे. आज 20 जुलै, रिलायन्स समूह आणि गुंतवणूकदारांसाठी खास दिवस आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आर्थिक सेवा देणारी कंपनी जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसे लिमिटेड (Jio Financial Services) यांचे डिमर्जर होत आहे. त्याची रेकॉर्ड डेट आज असेल. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांना एका शेअरच्या बदल्यात जेएफएसएलचा (JFSL) एक शेअर मिळणार आहे. त्यांना लाभांश देण्याची पण घोषणा होऊ शकते. गुंतवणूकारांना आज लॉटरी लागेल.

गुंतवणूकदारांना लॉटरी

या डिमर्जरच्या कवायतीमुळे रिलायन्सच्या शेअरमध्ये तेजीचे सत्र सुरु आहे. गुंतवणूकदारांच्या शेअरचे मूल्य आता वाढेल. कंपनीच्या बाजार मूल्यात वाढ होईल. रिलायन्स अनेक आघाड्यांवर गुंतवणूकदारांना कमाईची संधी देत आहे. शेअरचा बोनस तर आहेच. पण लाभांशची घोषणा झाली तर गुंतवणूकदारांची पाचही बोटे तुपात असतील.

हे सुद्धा वाचा

देशातील 5 वी मोठी वित्तीय संस्था

जेफरीजच्या दाव्यानुसार, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसचे बाजारातील मूल्य 90,000 ते 1.5 लाख कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. नवीन कंपनीच्या शेअरची किंमत 200 रुपयांच्या जवळपास असेल. तर मॅक्युरी रिसर्चनुसार, नवीन कंपनी झाल्यानंतर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस देशातील आर्थिक क्षेत्रातील 5 वी मोठी वित्तीय संस्था ठरेल .एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि ॲक्सिस बँक यानंतर जिओचा क्रमांक असेल. यंदा एचडीएफसी बँक आणि एचडीएफसी लिमिटेडचे विलिनीकरण झाले आहे. एचडीएफसी देशातील सर्वात मोठी बँक ठरली आहे.

गेल्यावर्षी झाली होती घोषणा

जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज आज, रिलायन्स इंडस्ट्रीजपासून स्वतंत्र होईल. आरआयएलने 8 जुलै रोजी बीएसई फाईलिंगवेळी ही घोषणा केली होती. या डिमर्जरला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने मंजूरी दिली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनीने याविषयीची घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्याच्या तिमाही वेळी ही घोषणा झाली होती. त्यानुसार, जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेज कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात येणार होती. त्याचा मुहूर्त आज लागणार आहे.

कंपनीची नेटवर्थ

या नवीन कंपनीचे एकूण भागभांडवल जवळपास 1,50,000 कोटी रुपये असेल. त्यामध्ये जवळपास 1,10,000 कोटी रुपये मूल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर असतील. उर्वरीत रक्कम तिचे मुळ भांडवल असेल. त्या तुलनेत स्पर्धक कंपनी बजाज फायनान्सचा पसारा मोठा आहे. ही NBFC वित्तीय सेक्टरमधली मोठी कंपनी आहे. तिचे एकूण भांडवल जवळपास 44,000 कोटी रुपये आहे.

पुढील वर्षात गुंतवणूकदार मालामाल

बिझनेस टुडेच्या एका बातमीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअरबद्दल बाजारात भाकीते वर्तविण्यात येत आहे. विविध तज्ज्ञ या शेअरबाबत त्यांचे विचार मांडत आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर पुढील वर्षात मार्च महिन्यात 3,000-3100 रुपयांपर्यंत झेप घेईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. रिलायन्स रिटेल, जिओ आयपीओ आणि ग्रीन एनर्जीसंदर्भात येत्या काही दिवसांत अनेक खुलासे होतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

आजचा दिवस का खास

बीएसई आणि एनएसई, डिमर्जर नंतर आरआयएलची किंमत जाणून घेण्यासाठी आज 20 जुलै रोजी खास प्री-ओपन सेशन आयोजीत करत आहे. आरआयएलच्या गेल्या सत्रातील क्लोजिंग प्राईस या सेशनसाठी आधारभूत किंमत असेल. बुधवारी रिलायन्स शेअरची क्लोजिंग प्राईस 2,840 रुपये आहे. आज स्पेशल प्री-ओपन सेशन नंतर हा शेअर 2,640 रुपयांवस स्थिर होईल. जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेच्या शेअरची किंमत 200 रुपये (2,840-2,640) राहण्याची शक्यता आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.