Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukesh Ambani : रिलायन्सला पहिल्यांदा धोबीपछाड! या सरकारी बँकेने तोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड

Mukesh Ambani : रिलायन्स कंपनीचा रेकॉर्ड पहिल्यांदाच मोडला. गेल्या दहा वर्षांपासून हा विक्रम अबाधीत होता. या सरकारी बँकेने कंपनीला धोबीपछाड दिली. रिलायन्सला पहिल्यांदा या आनंदाला मुकावे लागले.

Mukesh Ambani : रिलायन्सला पहिल्यांदा धोबीपछाड! या सरकारी बँकेने तोडला 10 वर्षांचा रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 8:55 AM

नवी दिल्ली | 09 ऑगस्ट 2023 : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) भारताचेच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे ते चेअरमन आहेत. त्यांना श्रीमंतांच्या यादीत झळकविण्यात रिलायन्सचा (Reliance Industry) सिंहाचा वाटा आहे. रिलायन्स कंपनी भारतातील मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. जगातील 100 कंपन्यांमध्ये सहभागी दोघांमध्ये रिलायन्ससोबत इंडियन ऑईल कॉर्पोरेशन आहे. रिलायन्सचे बाजारातील भागभांडवल 16.83 लाख कोटी कोटी रुपये आहे. रिलायन्सचा एकूण महसूल 23.2 टक्क्यांनी वाढला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये महसूलाने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. तो 9,76,524 कोटी रुपयांवर पोहचला. पण या आनंदावर या सरकारी बँकेने (Government Bank) विरजण घातले. गेल्या दहा वर्षांपासूनचा हा रेकॉर्ड तुटला.

काय होता रेकॉर्ड

मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सचे बाजारातील भागभांडवल मोठे आहे. ती सर्वात मौल्यवान कंपनी आहे. एका दशकांहून अधिक काळ सर्वाधिक नफ्यात असणारी ती एकमेव कंपनी ठरली आहे. ऑईल, टेलिकॉम आणि रिटेल सेक्टरमध्ये काम करणाऱ्या रिलायन्स देशातील कॉर्पोरेट कंपन्यांच्या यादीत सर्वात अग्रेसर आहे. पण भारतीय स्टेट बँकेने तिचा हा विक्रम यंदा खेचून आणला.

हे सुद्धा वाचा

SBI ची रिलायन्सवर मात

बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, चालू आर्थिक वर्षात 2023-24 च्या पहिल्या तिमाहीचे (एप्रिल-जून) निकाल समोर आले आहेत. यामध्ये एसबीआयने देशातील सर्वाधिक नफा कमाविला. रिलायन्सने या बाबतीत एसबीआयला धोबीपछाड दिली. एप्रिल-जूनमध्ये एसबीआयचा नफा 18,537 कोटी रुपये होता. तर रिलायन्स इंडस्ट्रीजला 16,011 कोटी रुपयांचा नफा झाला.

एका वर्षांत एसबीआय सूसाट

शेअर बाजारात एक संज्ञा अत्यंत लोकप्रिय आहे. त्याला TTM असे म्हणतात. टीटीएम म्हणजे ‘ट्रेलिंग 12 मंथ्स’. एखाद्या कंपनीचे गेल्या 12 महिन्यातील सातत्यपूर्ण कामगिरी कशी राहिली, याची चाचपणी. या आधारे एसबीआयने रिलायन्सला मागे फेकले आहे. गेल्या 20 वर्षातील कामगिरी पाहता TTM आधारे एसबीआयने दुसऱ्यांदा सर्वाधिक नफा कमाविला आहे.

किती मिळवला नफा

जून महिन्यातील टीटीएम आधारे एसबीआयने एकत्रित 66,860 कोटी रुपयांचा नफा कमाविला. तर रिलायन्स इंडस्ट्रीजने एकत्रितपणे 64,758 कोटी रुपयांचा नफा मिळवला. यापूर्वी जुलै-सप्टेंबर 2011 मध्ये एसबीआयचा नफा सर्वाधिक 18,810 कोटी रुपये होता. त्यावेळी रिलायन्सने 18,588 कोटींचा नफा मिळवला होता.

दोन वर्षांत अशी घेतली आघाडी

पीटीआयच्या वृत्तानुसार, फॉर्च्युन ग्लोबल यादीत मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या दोन वर्षांत रॉकेट भरारी घेतली. या कालावधीत कंपनीने रँकिंगमध्ये मोठी सुधारणा केली. 67 कंपन्यांना मागे फेकत, कंपनीने आगेकूच केली. 2021 साली कंपनी 155 व्या क्रमांकावर होती. फॉर्च्युन ग्लोबल 500 यादी दरवर्षी प्रसिद्ध होते. अनेक मानकांआधारे कंपनीची घौडदोड तपासण्यात येते.

संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती
संसदेत होणार छावाचं स्क्रीनिंग; पंतप्रधान मोदींसह खासदारांची उपस्थिती.
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली
अन् एकनाथ शिंदेंनी 'त्या' मजूर कुटुंबाची जबाबदारी उचलली.
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी
भर उन्हात बरसल्या अवकाळी पावसाच्या सरी.
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर
मग तुम्ही हजामत करत होते का? जयंत पाटलांनी सरकारला धरलं धारेवर.
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं
आदित्य ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने; एकमेकांना बघणं टाळलं.
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच...
ठाकरे अन् शिंदे सर्वपक्षीय बैठकीत आमने-सामने, शिंदे दालनात येताच....
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.